World Cup : विराट विक्रम, कोहलीने टाकलं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे!

icc cricket world cup : India Vs Pakistanभारताचा हिटमॅन रोहित शर्माने शतक केलं त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली.

News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 06:59 PM IST

World Cup  : विराट विक्रम, कोहलीने टाकलं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे!

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट वर्ल्ड़ कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराटने मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम मोडला.

भारताचा कर्णधार आणि रनमशिन विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत नवा विक्रम नोंदवला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावा करण्यासाठी विराटला 57 धावा हव्या होत्या. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा त्याच्या 62 चेंडूत नाबाद 71 धावा झाल्या होत्या. सचिनने 11 हजार धावा 276 डावात केल्या होत्या. तर विराटने 223 डावात 11 हजार धावा पूर्ण केल्या.

सचिनचा आणखी एक विक्रम मोडण्याची कोहलीला संधी होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तो 18 धावांनी कमी पडला होता.

कोलहीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 8 शतकं केली आहेत. त्याला सचिनचा विक्रम मोडण्यासाठी आणखी एका शतकाची गरज आहे.

वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. 13 जूनचा सामना पावसाने रद्द झाला होता. गुणतक्त्यात भारत 5 गुणांसह चौथ्या स्थानी आहे.

वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. 13 जूनला न्यूझीलंडशी तर 16 जूनला पाकिस्तानशी भारताचा सामना होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 06:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close