लॉर्ड्स, 21 जून: ICC Cricket World Cupमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या लंकेनं इंग्लंडसमोर 232 धावांचं आव्हान उभा केलं होतं. लंकेच्या मलिंगा आणि डीसिल्वाच्या माऱ्यासमोर बलाढ्य इंग्लंडचा धुव्वा उडाला. श्रीलंकेने इंग्लंडला 212 धावात रोखून विजय मिळवला. इंग्लंडच्या बेन स्टोक्सने दिलेली एकाकी झुंज व्यर्थ गेली. इंग्लंडच्या 38 षटकांत 5 बाद 170 धावा झाल्या होत्या. त्यानंतर लंकेन सामन्यावर पकड मिळवली. मोईन अली, ख्रिस वोक्स आणि आदील राशिद यांना लंकेच्या गोलंदाजांनी 8 धावांच्या अतंरात बाद केलं. त्यामुळे 5 बाद 170 वरून लंकेची अवस्था 8 बाद 178 धावा अशी झाली. मलिंगाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर डीसिल्वाने तीन गडी बाद केले.
इंग्लंडचे सलामीवीर जेम्स विन्स 14 तर जॉनी बेअरस्टो शून्यावर बाद झाले. त्यानंतर जो रूट आणि इयॉन मॉर्गन डाव सावरला पण मॉर्गनला बाद करून उदानाने इंग्लंडला तिसरा धक्का दिला. त्यानंतर मलिंगाने जो रूटला बाद केलं. रूटने 57 धावा केल्या. रूटनंतर बटलरला 10 धावांवर पायचित केलं.
तत्पूर्वी, जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांच्या माऱ्यासमोर लंकेनं सपशेल लोटांगण घातलं. दोघांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. लंकेकडून सर्वाधिक अँजेलो मॅथ्यूजने नाबाद 85 धावा केल्या. त्याच्याशिवाय अविश्का फर्नांडोने 49 धावा आणि कुशल मेंडिसने 46 धावा करून मधल्या फळीत डाव सावरला. पण इतर फलंदाज मात्र इंग्लंडच्या माऱ्यासमोर टिकाव धरू शकले नाहीत. सलामीची जोडी केवळ 3 धावा करून तंबूत परतली. अँजेलो मॅथ्यूजने शेवटपर्यंत एका बाजूने सावध खेळ केला.इंग्लंडकडून आदील राशिदने दोन तर वोक्सने एक गडी बाद केला. 50 षटकांत लंकेच्या 9 बाद 232 धावा झाल्या.
आज इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात इंग्लंडच्या संघानं जवळजवळ सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केलं आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागचा सामना 87 धावांनी गमविणाऱ्या श्रीलंकेला आपले आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना जिंकावा लागणार आहे. गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ 4 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना पुढील चारही सामने जिंकावेच लागतील.
दुसरीकडे, इंग्लंडने पाचपैकी चार सामने जिंकले आहे. पाककडून झालेल्या पराभवानंतर सुधारणा करीत इंग्लंड दुसऱ्या स्थानी आला. तर, पाचपैकी चार वेळा त्यांनी 300 च्या वर धावा उभारल्या. बांगलादेशविरुद्ध 386 आणि अफगाणिस्तानविरुद्ध 396 अशी विक्रमी धावसंख्या उभारली.
Sri Lanka win the toss and bat first in Leeds!#CWC19 | #ENGvSL pic.twitter.com/mtBLaipiDH
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 21, 2019
हेड-टू-हेड
दोन्ही संघांनी आतापर्यंत 74 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यातील 36 सामने इंग्लंडने तर, 35 सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना बरोबरीत सुटला आहे. तर, 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. दोन्ही संघांमधील शेवटच्या 5 लढतीमधील 3 सामने इंग्लंडने, तर एका सामना श्रीलंकेने जिंकला आहे.
वर्ल्ड कपमध्ये आमनेसामने
दोन्ही संघ वर्ल्ड कपमध्ये 10वेळा आमनेसामने आले असून यातील 6 सामन्यांत इंग्लंडने, तर 4 सामन्यांत श्रीलंकेने विजय मिळवला आहे.
वाचा- विराटसाठी आनंदाची बातमी, वर्ल्ड कप गाजवणारा अष्टपैलू खेळाडू फिट
वाचा- वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या विराटसेनेचं रुप पालटलं, PHOTO व्हायरल
वाचा- ...म्हणून पाक संघानं ऐकला नाही PM इमरान यांचा सल्ला
सानियासाठी 'रावळपिंडी एक्स्प्रेस' उतरली मैदानात, ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं