World Cup : न्यूझीलंडचा विजयी चौकार, आफ्रिकेचा 4 गडी राखून पराभव

World Cup : न्यूझीलंडचा विजयी चौकार, आफ्रिकेचा 4 गडी राखून पराभव

ICC Cricket World Cup 2019 : South Africa vs New Zealand : केन विल्यम्सनच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने वर्ल्ड कपमधील चौथा विजय साजरा केला. तर दक्षिण आफ्रिकेचा हा चौथा पराभव ठरला.

  • Share this:

बर्मिंगहम, 20 जून : दक्षिण आफ्रिकेनं दिलेलं 242 धावांचं आव्हान न्यूझीलंडने केन विल्यम्सनच्या शतकाच्या आणि ग्रॅण्डहोमच्या अर्धशतकाच्या जोरावर पूर्ण केलं. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे 49 षटकांच्या झालेल्या या सामन्यात आफ्रिकेला 241 धावा करता आल्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली. सलामीवीर कुलिन मुनरोला रबाडाने बाद करून पहिला दणका दिला. मुनरो 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर मार्टिन गुप्टिल हिटविकेट बाद झाला. गुप्टिल बाद झाल्यानंतर रॉस टेलर आणि टॉम लॅथम हे दोघेही फक्त एक धाव काढून बाद झाले.

न्यूझीलंडची 4 बाद 80 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर केन विल्यम्सनने जेम्स नीशामसोबत 57 धावांची भागिदारी करत डाव सावरला. जेम्सला बाद करून निशामने ही जोडी फोडली. निशामनंतर आलेल्या ग्रॅण्डहोमने विल्यम्सनसोबत 91 धावांची भागिदारी करत संघाला विजयाच्या समिप पोहचवले. उंच फटका मारण्याच्या नादात एनगिडीच्या गोलंदाजीवर ग्रँडहोम बाद झाला. त्यानंतर मिशेल सेंटनर आणि केन विल्यम्सनने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. केन विल्यम्सनने शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत शतक केले. त्यानंतर चौकार मारून विजय साजरा केला. त्याने 106 धावा केल्या. आफ्रिकेकडून ख्रिस मोरिसने तीन गडी बाद केले. रबाडा, पेहलुक्वायो आणि एनगिडी यांनी एक गडी बाद केला.

दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना 241 धावा केल्या. हाशिम आमला आणि दुस्सेन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आफ्रिकेनं न्यूझीलंडसमोर 241 धावांचं आव्हान ठेवलं. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर इतर गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला फंलदाजीला पाचारण केलं. त्यांची सुरूवात खराब झाली. ट्रेंट बोल्टनं डी कॉकचा त्रिफळा उडवून आफ्रिकेला धक्का दिला. त्यानंतर फर्ग्युसनने कर्णधार फाफ ड्युप्लेसीसला बाद केलं. आमलाने एक बाजू सांभाळत अर्धशतक साजरं केलं. त्याला 55 धावांवर सेंटनरनं बाद केलं. त्यानंतर मार्करम आणि डेव्हिड मिलर यांनी धावसंख्येत भर घालण्याचा प्रयत्न केला.

न्यूझीलंडने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. दक्षिण आफ्रिकेनं लुंगी एनगिडीला पुन्हा संघात घेतंल आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यास आफ्रिकेचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात येईल. त्यांच्यासाठी हा सामना करो किंवा मरो असाच आहे.

वाचा- सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...

वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव

वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया

SPECIAL REPORT : कॅट फाईट, वातावरण टाईट ; सानियाने वीणाला सुनावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2019 12:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading