World Cup : पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 49 धावांनी विजय

World Cup : पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 49 धावांनी विजय

ICC Cricket World Cup 2019 पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून यंदाच्या वर्ल्ड कपमधील दुसऱ्या विजयाची नोंद केली. दोन्ही संघांचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे.

  • Share this:

लॉर्ड्स, 23 जून : ICC Cricket World Cup 2019 पाकिस्तानने दिलेल्या 308 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेला 9 बाद 259 धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानने हा सामना 49 धावांनी जिंकला. शादाब खान आणि मोहम्महद आमिरच्या गोलंदाजीसमोर आफ्रिकेचे फलंदाज तग धरू शकले नाहीत. आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम आमला फक्त दोन धावा करून बाद झाला. त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि फाफ डुप्लेसीने 87 धावांची भागिदारी केली. मात्र डी कॉकला बाद करून शादाब खानने ही जोडी फोडली. त्यानंतर मार्करम आणि फाफ डुप्लेसी बाद झाले. डुप्लेसीने सर्वाधिक 63 धावा केल्या.

दुस्सेन आणि डेव्हिड मिलरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र,पुन्हा शादाब खानने दुस्सेनला बाद करून विजयातील अडसर दूर केला. खत्यानंतर शाहिन आफ्रिदीने डेव्हिड मिलरला तर वहाब रियाझने ख्रिस मोरिसला बाद केलं. अॅडिली पेहलुक्वायोनं फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला पण अखेरच्या षटकात वहाब रियाझने टिच्चून मारा केल्यानं अपेक्षित धावगती वाढली.

तत्पूर्वी,पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेसमोर 309 धावांचे आव्हान ठेवले. पाकने 50 षटकांत 7 बाद 308 धावा केल्या. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानला इम्रान ताहिरने पहिला दणका दिला. त्याने सलामीवीर फखर जमानला बाद केलं. फखरने 44 धावांची खेळी केली. त्यानंतर इमामलासुद्धा त्यानेच बाद केलं. इमाम 44 धावांवर बाद झाला. मोहम्मद हाफिजला मार्करमने पायचित करून पाकिस्तानला तिसरा दणका दिला.

पाकिस्तानच्या 30 षटकांत 3 बाद 143 वरून बाबर आझम आणि हॅरिस सोहेल यांनी डाव सावरला. दोघांनी 81 धावांची भागिदारी केली. पेहहुक्वायोनं बाबर आझमला बाद करून ही जोडी फोडली. त्याने 80 चेंडूत 69 धावा केल्या. त्यानंतर इमाद वासिमला लुंगी एनगिडीने बाद केलं.

भारताविरुद्धच्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानने संघात बदल केले आहेत. त्यांनी शोएब मलिकच्या जागी हारिस सोहेलला संघात घेतलं आहे. हसन अलीऐवजी शाहिन अलीला स्थान दिलं आहे. तर दक्षिण आफ्रिकेनं संघात कोणताही बदल केलेला नाही.

पाक आणि आफ्रिका दोन्ही संघांची वर्ल्ड कपमधील कामगिरी निराशाजनक अशीच आहे. आफ्रिकेनं आतापर्यंत फक्त एक सामना जिंकला असून फक्त तीन गुण झाले आहेत. त्यांचे वर्ल्ड कपमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. तर पाकिस्तानच्या आशा अजून जिवंत आहेत. त्यांना उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवणं अपेक्षित असून इतर संघांच्या जय पराजयावर त्यांची पुढची वाटचाल ठरणार आहे.

SPECIAL REPORT: पाकिस्तानच्या कर्णधाराची चाहत्यांकडून खिल्ली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2019 11:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading