पांड्याच्या कौतुकाने रणवीर सिंग अडचणीत, WWE स्टारच्या वकिलाने दिली खटल्याची धमकी!

ICC Cricket World Cup 2019 : भारत-पाक यांच्यातील सामन्यावेळी बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने पांड्यासोबत काढलेला फोटो शेअर करताना ईट. स्लीप. डॉमिनंट. रिपीट असा कॅप्शन दिला होता.

News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2019 10:15 PM IST

पांड्याच्या कौतुकाने रणवीर सिंग अडचणीत, WWE स्टारच्या वकिलाने दिली खटल्याची धमकी!

लंडन, 19 जून : ICC Cricket World Cup 2019 :भारत आणि पाकिस्तान सामन्यावेळी बॉलीवूड अभिनेता रणवीरसिंग उपस्थित होता. त्याच्या अतरंगी स्वभावाने तो नेहमीच चर्चेत असतो. रणवीर कधी काय करेल सांगता येत नाही. त्याच्या कपड्यांवरून अनेकदा तो ट्रोल झाला आहे. आताही भारत-पाक सामन्यावेळी त्याने कमेंट्री केली. तसेच काही दिग्गज खेळाडूंना भेटला. त्याचबरोबर आणखी एका गोष्टीने त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं ते म्हणजे पराभूत झालेल्या पाकिस्तान संघाच्या चाहत्याला रणवीरने धीर दिला होता. यात आता नवीन वादाची ठिणगी पडली आहे. सामन्यानंतर त्याने अनेक खेळाडूंसोबतचे फोटो शेअर केले आहेत. यात शिखर धवन, हार्दिक पांड्या यांचा समावेश आहे.

हार्दिक पांड्यासोबतच्या फोटोच्या ट्विटने रणवीरसिंग अडचणीत आला आहे. त्याच्यावर WWE स्टार ब्रॉक लेस्नरचा व्यवस्थापक आणि वकील पॉल हेमन यांनी रणवीरवर चोरीचा आरोप केला आहे. रणवीरने लेस्नरच्या स्लोगनचा वापर केल्याचं पॉल पेमन यांनी म्हटलं आहे.


रणवीर सिंगने हार्दिक पांड्यासोबतचा फोटो ट्विटरवर टाकला आहे. त्यानं फोटोला कॅप्शन देताना, 'ईट, स्लीप, डोमिनंट, रिपीट'चे नाव हार्दिक आहे. यावर पॉल हेमनने उत्तर दिलं आहे. काय तु गंमत करत आहेस का? ईट, स्लीप, कॉन्कर, रिपीट असतं. याचे कॉपीराईट हक्क ब्रॉक लेस्नरकडे आहेत. याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहे. ईट, स्लीप, डिपॉजीशन, रिपिट असं उत्तर पॉल हेमन यांनी दिलं आहे.


Loading...

ईट, स्लीप, कॉन्कर, रिपीट ही लेस्नरची लढतीआधीची स्लोगन आहे. तो जेव्हाही रिंगमध्ये उतरतो त्यावेळी रिपीट करतो. 2014 मध्ये अंडरटेकरच्या सलग विजयाचा विक्रम मोडल्यानंतर त्याने याचा वापर करायला सुरूवात केली होती.

लेस्नर पुन्हा रिंगमध्ये उतरल्यापासून ही स्लोगन त्याच्यासोबतच आहे. त्याने कपड्यांवरसुद्धा छापून घेतली आहे. हेमनने याआधी किक्रेट वर्ल्ड कपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटला याबाबत इशारा दिला होता. क्रिकेट वर्ल्‍ड कपनं धोनीचं कौतुक करताना 'ईट. स्‍लीप. फिनिश मॅच. रिपीट. धोनी लाईफ.' असं म्हटलं होतं.


वाचा- सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...

वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव

वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया

VIDEO : ...तर लाज का वाटते, उद्धव ठाकरेंचा ओवेसींवर हल्लाबोल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 10:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...