लंडन, 28 जून : ICC Cricket World Cup 2019मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या सामन्यात भारतानं 269 धावांपर्यंत मजल मारली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ फक्त 143 धावा करू शकला. भारताने या विजयासह आपली सेमीफायनलचं तिकिट पक्कं केलं आहे. भारत हा वर्ल्ड कपमधला एकमेव अपारजित संघ आहे. विराटसेनेनं 5 पैकी 5ही सामने जिंकले आहेत तर, एक सामना पावसामुळं रद्द झाला. त्यामुळं भारतीय संघ सध्या 11 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी ऑस्ट्रेलियानं सेमीफायनलमध्ये 12 गुणांसह प्रवेश केला आहे.
मात्र, भारताच्या विजयानं पाकिस्तानला फायदा झाला आहे. कारण वेस्ट इंडिजचा संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी केवळ एक पाऊल लांब आहे. भारताला केवळ एका विजयाची गरज आहे. भारताचे आता इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याविरोधात सामने बाकी आहेत.
India move up to second place in the #CWC19 standings following a dominant victory over West Indies.#CricketWorldCup2019 pic.twitter.com/gc8PjKUXQd
— CricketNext (@cricketnext) June 27, 2019
इंग्लंडचे काय होणार
यजमान इंग्लंड संघाला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याकडून मिळालेल्या पराभवामुळं मोठा फटका बसला आहे. 8 गुणांसह इंग्लंड सध्या चौथ्या क्रमांकावर असला री, त्यांचे सेमीफायनलमधील स्थान धोकादायक आहे. इंग्लंडचे दोन सामने बाकी आहेत, हे दोन्ही सामने न्यूझीलंड आणि भारत यांच्याविरोधात होणार आहेत. त्यामुळं इंग्लंडच्या समस्या वाढल्या आहेत.
लंकेला आफ्रिकेवर विजय गरजेचा
सेमीफायनलला पोहचण्याच्या स्पर्धेत न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात टक्कर होणार आहे. लंकेनं आफ्रिकेवर विजय मिळवला तर त्यांच्या आशा जिवंत राहतील. मात्र पराभव झाल्यास त्यांनाही गाशा गुंडाळावा लागेल.
पाकिस्तान अजूनही रेसमध्ये
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांना पराभूत करत पाक संघानं वर्ल्ड कपमध्ये कमबॅक केले आहे. 7 गुणांसह सध्या पाकचा संघ 6व्या क्रमांकावर आहे. मात्र पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतावर अवलंबून रहावे लागणार आहे. भारतानं सर्व सामने जिंकल्यास पाकिस्तान सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो.
तीन संघांचे पॅकअप
विडींजप्रमाणे दक्षिण आफ्रिकासुद्धा स्पर्धेतून बाहेर पडली आहे. आफ्रिकेला सात सामन्यात तीन गुण मिळाले आहेत. लंकेविरुद्ध त्यांचा विजय किंवा पराभव फक्त गुणतक्त्यातील स्थान थोडे वरच्या क्रमांकावर आणण्यास मदत करेल. सध्या ते नवव्या क्रमांकावर आहेत. स्पर्धेतून सर्वात आधी अफगाणिस्तान बाहेर पडले असून त्यांना एकही विजय मिळवता आलेला नाही. गुणतक्त्यात ते दहाव्या स्थानावर आहेत. त्यांचा सातही सामन्यात पराभव झाला आहे.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईवर पाणीबाणीचं सावट