INDvsENG : VIDEO : जडेजाची कमाल! नेटकरी म्हणतात 'मेरी शक्तियोंका गलत इस्तमाल'

INDvsENG : VIDEO : जडेजाची कमाल! नेटकरी म्हणतात 'मेरी शक्तियोंका गलत इस्तमाल'

ICC Cricket World Cup : जडेजाने सीमारेषेवर जेसन रॉयचा अफलातून झेल घेत भारताला पहिलं यश मिळवून दिलं.

  • Share this:

बर्मिंगहम, 30 जून : इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर सलामीच्या जोडीने 22 षटकांत 160 धावांची भागिदारी केली. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोनं फटकेबाजी करत भक्कम सुरुवात करून दिली. भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने जेसन रॉयला बाद करून ही जोडी फोडली. 23 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जेसन रॉय झेलबाद झाला. जेसन रॉयने 66 धावा केल्या.

2019 च्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा एखाद्या संघाकडून पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या फिंच आणि वॉर्नरने 60 धावांची भागिदारी केली होती. इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने भारताच्या गोलंदाजांना संधीच दिली नव्हती. दरम्यान, केएल राहुलला क्षेत्ररक्षण करताना पाठीला दुखापत लागल्यानं अर्ध्यातून मैदान सोडावं लागलं. त्याच्या जागी रविंद्र जडेजा मैदानात आला. त्यानेच जेसन रॉयचा अप्रतिम झेल घेतला. सीमारेषेवर असलेल्या जडेजाने धावत येऊन सूर मारत झेल टिपला.

जडेजाला आतापर्यंत दुसऱ्यांदा बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षणाची संधी मिळाली आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध भुवनेश्वर कुमार बाहेर गेल्यानंतर क्षेत्ररक्षण केलं होतं. जडेजाने घेतलेल्या झेलनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. जडेजाच्या दुसरा कोणी असता तर झेल घेतला असता का? असा प्रश्नही विचारला जात आहे.

वर्ल्ड कपमध्ये जडेजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेलं नाही. तो गोलंदाजीसह फलंदाजीसुद्धा करू शकतो. सध्या संघात हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू आहे. इंग्लंडविरुद्ध विजय शंकरला विश्रांती देण्यात आली आहे. जडेजा अष्टपैलू असताना त्याला संघात घेतला नाही. तरीही बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षणात कमाल केली आहे. यामुळे सध्या त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्यावं असंही म्हटलं जात आहे.

जडेजाने घेतलेल्या झेलनंतर त्याच्याकडे क्षमता असूनसुद्धा संघात घेतलं नाही. त्याच्या कौशल्याचा चुकीचा वापर होत असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.

VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा

First published: June 30, 2019, 7:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading