World Cup : INDvsPAK : रोहितनं पाकलासुद्धा शिकवलं कसं करायचं शतक!

ICC Cricket World Cup 2019 : India Vs Pakistan : रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून वर्ल्ड कपमधील तीन सामन्यात त्याने दोन शतकं आणि एक अर्धशतक केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 06:49 PM IST

World Cup : INDvsPAK : रोहितनं पाकलासुद्धा शिकवलं कसं करायचं शतक!

मँचेस्टर, 16 जून : यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा हिटमॅन रोहित शर्माने दुसरं शतक झळकावलं. भारताच्या 2019 च्या वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात त्याने नाबाद 122 धावा करून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून दिला होता. त्यानतंर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. तेव्हा त्याने 70 चेंडूत 57 धावा केल्या होत्या. तर शिखर धवनने शतक साजरं केलं होतं.

रोहितची सुरुवात धीमी दिसत असली तर रोहितची आकडेवारी पाहिली तर, आपल्या लक्षात येईल की, 11 ते 35 ओव्हरमध्ये रोहितनं जितक्या धावा केल्या आहेत. यात रोहित 8व्या क्रमांकावर आहे. मात्र शेवटच्या 15 ओव्हरमध्ये रोहितनं सर्वात जलद धावा केल्या आहेत. पहिल्या10 ओव्हरमध्ये रोहितचा स्ट्राईक रेट 75 आहे तर, 11 ते 35 ओव्हरमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 101.22 आहे. तर, शेवटच्या 15ओव्हरमध्ये रोहित 153.56च्या स्ट्राईक रेटनं धावा करतो. तरी त्याला धिम्या गतीचा फलंदाज म्हटले जाते.


 


Loading...सलामीवीर असेलला रोहित शर्मा पहिल्या 10 षटकात धीम्या गतीनं धावा काढतो, असा आरोप त्याच्यावर केला जातो. यामुळेच तो सर्वात धिम्या गतीचा फलंदाज ठरला आहे. त्याच्यानंतर कमी धावगतीने धावा करण्यात बांगलादेशच्या तमीम इकबाल याचा नंबर लागतो. मात्र, जर आपण रोहितच्या 10 ओव्हरनंतरचा रनरेट पाहिला तर, तुम्हाला आश्चर्य वाटेल. याबाबत रोहितनं टाईम्स ऑफ इंडियाशी केलेल्या चर्चेत म्हटलं होतं की, माझी खेळण्याची पद्धत अशीच आहे. मी जेव्हा द्विशतक केलं होतं तेव्हा पहिल्या दहा षटकांत कमी धावा केल्या होत्या. त्यामुळं माझी सुरुवात संथ असली तरी त्यामुळे पुन्हा फटकेबाजीला संधी मिळते आणि याचा फायदाही होतो.

रोहितनं उतरवली पाकची नशा, हायवोल्टेज सामन्यात झंझावती शतक

रोहित शर्मा म्हणाला होता की, तीन द्विशतकं केल्यानंतरही लोक मला टिप्स देतात. मला लेक्चर देणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे. मी फक्त एकतो आणि सोडून देतो. या गोष्टींचा माझ्यावर थेट परिणाम होत नाही. घरातून बाहेर पडताच मला जी लोक भेटतात ती म्हणतात, स्ट्रेट ड्राईव्ह नीट मार, कव्हर ड्राईव्ह सुधार असे सल्ले देत असतात.

यांनी 147 धावांची भागिदारी केली होती. त्यानंतर यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये वॉर्नर-फिंच यांनी 146 धावा केल्या होत्या. World Cup India vs Pakistan: येथे पाहा महामुकाबला Live


VIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 05:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...