VIDEO : INDvsPAK : गोलंदाजांची धुलाई सुरू असताना पाकच्या कर्णधाराला आली झोप!

VIDEO : INDvsPAK : गोलंदाजांची धुलाई सुरू असताना पाकच्या कर्णधाराला आली झोप!

ICC Cricket World Cup 2019 : India vs Pakistan : भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या. हिटमॅन रोहित शर्माने शतक तर केएल राहुल आणि विराट कोहली यांनी अर्धशतके केली.

  • Share this:

मँचेस्टर, 16 जून : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यात भारताने पाकच्या गोलंदाजांची धुलाई केली. हिटमॅन रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी शतकी भागिदारी केली. हिटमॅननं शतक केलं तर केएल राहुल आणि विराट कोहलीनं अर्धशतके केली. या खेळीच्या जोरावर भारताने 5 बाद 336 धावा केल्या. पाकिस्तानने केलेल्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा भारतीय फलंदाजांनी उचलला. रोहित शर्माला धावबाद करण्याची चूक त्यांना महागात पडली. दरम्यान, या सामन्यापूर्वी पाकच्या कर्णधाराने संघ सहकाऱ्यांना भारतानविरुद्ध कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही असे सांगितले असताना स्वत: मात्र अनेक चुका केल्याचं दिसत आहे. आता त्याला ट्रोलही केलं जात आहे.

भारताविरुद्धच्या सामन्यात आपल्यावर दबाव असेल हे पाकचा कर्णधार सर्फराज अहमदने या सामन्यापूर्वी सांगितलं होतं. या सामन्यात अधिक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न आम्ही करू तसेच हा सामना जिंकण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू असं पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने म्हटलं होतं. त्याने आपल्या खेळाडूंना ताकीद दिली होती की, भारताविरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे. यात कोणतीही चूक नको. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करावी लागेल. खेळात कमी पडल्यास काहीही कारण चालणार नाही.

सर्फराज स्वत:च संघ सहकाऱ्यांना दिलेल्या सूचना विसरला. सामन्यात पाकच्या गोलंदाजांवर भारतीय फलंदाज तुटून पडले होते. गोलंदाजांची केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली यांनी झोप उडवली असताना यष्टीमागे उभा असलेला पाकचा कर्णधार सर्फराज अहमद मात्र जांभई देत असलेला बघायला मिळाला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने सर्फराज अहमदवर जोरदार टीका केली होती. त्याने असा अनफीट कर्णधार कधीच पाहिला नसल्याचं म्हणत प्रश्न उपस्थित केले होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा 7 विकेटनं पराभव झाला होता.

रोहितनं उतरवली पाकची नशा, हायवोल्टेज सामन्यात झंझावती शतक

यांनी 147 धावांची भागिदारी केली होती. त्यानंतर यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये वॉर्नर-फिंच यांनी 146 धावा केल्या होत्या. World Cup India vs Pakistan: येथे पाहा महामुकाबला Live

VIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला वर्ल्ड कपचा धम्माल अनुभव

First published: June 16, 2019, 9:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading