World Cup : भारतासमोर चौथ्या क्रमांकाचा पेच, रिषभ पंतला संधी द्यावी?

World Cup : भारतासमोर चौथ्या क्रमांकाचा पेच, रिषभ पंतला संधी द्यावी?

ICC Cricket World Cup : आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मधल्या फळीत चौथ्या क्रमांकावर अद्यापही भारताला सक्षम पर्याय सापडला नसल्याचं दिसत आहे.

  • Share this:

साउथॅम्पटन, 27 जून : ICC Cricket World Cup मध्ये भारत सध्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. याचं कारण फलंदाजीत आघाडीची फळी आणि गोलंदाजी आहे. भारताचे आघाडीचे तीन फलंदाज रोहित शर्मा, विराट आणि धवन मोठी खेळी करतात तेव्हा मोठं आव्हान उभा करता येतं. तर जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव यांच्या माऱ्यासमोर धावा करणं प्रतिस्पर्धी संघाला कठीण होतं. गेल्या दोन वर्षांत भारताने मिळवलेल्या विजयात हेच मोठं कारण आहे. दरम्यन भारतासमोर मधल्या फळीत खेळणाऱ्या फलंदाजांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. अनेकदा मोक्याच्या क्षणी मधली फळी ढेपाळलेली दिसली आहे. भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज धोनीचा फॉर्म पूर्वीसारखा राहिला नाही. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने 52 चेंडूत 28 धावा केल्या होत्या. तर या सामन्यात 59 चेंडूत अर्धशतक साजरं केलं.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय फलंदाज काही धडा घेतील असं वाटत होतं. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्ध पुन्हा एकदा विराट वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली. भारताकडून विराट कोहलीने 72 तर केएल राहुलने 48 आणि पांड्याने 46 धावा केल्या. यात पांड्या वगळता इतर फलंदाजांना वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीवर धावा करताना धडपड़ करावी लागली. विराट कोहली वगळता इतर फलंदाज वेस्ट इंडिजच्या भेदक माऱ्यासमोर फार काळ टिकू शकले नाहीत. सलामीवीर रोहित शर्मा फक्त 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने डाव सावरला. पण राहुल बाद झाल्यानंतर विजय शंकरसुद्धा 14 धावांवर बाद झाला. विजय शंकरनंतर केदार जाधव धोनीच्या आधी फलंदाजीला आला. तो फक्त 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या धोनीची सुरुवात अडखळत झाली. त्याला 8 धावांवर असताना जीवदान मिळाले. धोनीने पांड्यासोबत डाव सावरला पण फटकेबाजीच्या नादात पांड्या झेलबाद झाला.

गेल्या सामन्यात भारताचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले होते. भारताच्या चार बाद 135 धावा झाल्या होत्या. त्यावेळी 20 ओव्हर बाकी होत्या. त्यानंतर भारताला फक्त 89 धावा करता आल्या. यामध्ये धोनी सर्वात जास्त वेळ मैदानात होता. यात वेगाने धावा न होण्यामागे केदार जाधव आणि धोनी यांची संथ खेळी होती. धोनी फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर धावांसाठी धडपडताना दिसत होता. अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर त्याने 52 चेंडूत फक्त 28 धावा केल्या.

भारताच्या 3 बाद 122 धावा असताना धोनी मैदानात आला होता. त्यानंतर कोहली 31 व्या षटकात बाद झाला. धोनीने पहिल्या 26 चेंडूत एकही चौकार मारला नाही. तसेच वेगवान गोलंदाजाच्या 9 चेंडूत त्याने 16 धावा केल्या. त्याने वेगवान गोलंदाजांनाच तीन चौकार मारले. तर फिरकीपटूंच्या 43 चेंडूत त्याने फक्त 12 धावा केल्या. यात धोनीने जवळपास 30 चेंडू निर्धाव खेळले.

चौथ्या क्रमांकावर कोण?

वर्ल्ड कपमध्ये 5 सामन्यात भारताने चार नंबरवर तीन फलंदाज खेळवले. यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. पांड्या नेहमी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतो पण सामन्यातील परिस्थिती पाहून त्याला बढती दिली गेली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलला संधी देण्यात आली होती. चौथ्या क्रमांकासाठी तोच योग्य पर्याय होता. मात्र, शिखर धवन स्पर्धेला मुकल्यानं त्याला सलामीला उतरावं लागत आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्ध विजय शंकर चौथ्या क्रमांकावर उतरला. त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. तसेच रोहित आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर धावगतीचा वेगही मंदावतो. भारतासमोर सध्यातरी मधल्या फळीतील फलंदाजी डोकेदुखी ठरत आहे.

विजय शंकर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून पदार्पण करणाऱ्या विजय शंकराला वर्ल्ड कपमध्ये फक्त एकदा चौथ्या क्रमांकावर फंलदाजी करण्याची संधी मिळाली आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध फक्त 29 धावा केल्या. शंकर गोलंदाजीसुद्धा करू शकतो. त्याने पाकिस्तानविरुद्ध दोन विकेट घेतल्या.पण त्याला अफगाणिस्तानविरुद्ध गोलंदाजी दिली नाही.

दिनेश कार्तिक

भारताकडे चौथ्या क्रमांकासाठी दावेदारांची कमी नाही. राखीव यष्टीरक्षक म्हणून संघात असलेल्या दिनेश कार्तिकने आतापर्यंत 77 डावात फलंदाजी केली असून यात सर्वाधिक चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकलं नाही. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 38.72 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. कार्तिकच्या अनुभवाचा फायदा भारताला होऊ शकतो.

रिषभ पंत

शिखर धवन बाहेर पडल्यानं संघात रिषभ पंतला संधी मिळाली आहे. मात्र अंतिम अकरामध्ये त्याला स्थान मिळू शकलेलं नाही. पंतने फक्त 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने गेल्या वर्षी इंग्लडंमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत शतक केलं होतं. त्यानंतर आयपीएलमध्येही जबरदस्त कामगिरी केली आहेत. किमान इंग्लंडविरुद्ध त्याला संधी द्यायला हवी. भारताचा पुढचा सामना रविवारी इंग्लंडविरुद्ध आहे.

धोनीची संथ खेळी

गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावरसुद्धा धोनीने संथ खेळी केली होती. यात त्याने एका सामन्यात 59 चेंडूत 37 तर दुसऱ्या सामन्यात 66 चेंडूत 42 धावा केल्या होत्या. या दोन्ही सामन्यात भारताचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले होते. तर दुसऱ्या बाजून पडझड होत असल्यानं धोनीनं संयमाने फलंदाजी केली होती. या दोन्ही सामन्यात भारताचा पराभव झाला होता. धोनी सध्या फलंदाजीत कमी पडत असला तरी त्याला बेस्ट फिनिशर म्हणूनही ओळखलं जातं. तसेच त्याच्या यष्टीरक्षणाचा आणि अनुभवाचा फायदा संघाला वेळोवेळी होत आहे. धोनीच्या फलंदाजीवरून जरी टीका होत असली तरी त्याचा अनुभव दबावाच्या वेळी महत्त्वाचा ठरत आहे. कोणत्याही परिस्थितीत शांतपणे निर्णय घेण्यात कोहलीला धोनीची मदत होते.

वाचा- World Cup IND vs WI : 'माही मार रहा है', आज सिद्ध करून दाखवण्याची संधी!

वाचा- गेली 23 वर्ष भारत 'या' संघाविरुद्ध अपराजीत राहिला; आज काय होणार?

वाचा- सामन्याआधीच भारतानं इंग्लंडला दिला दणका, हिसकावून घेतले पहिले स्थान

टीम इंडियाच्या भगव्या जर्सीची राजकीय बॅटिंग

First Published: Jun 27, 2019 07:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading