लंडन, 30 जून : ICC Cricket World Cup मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 16 जूनला झाला. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन देशातील सामना म्हणजे मैदानावरचं युद्ध असतं. मँचेस्टरवर झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 89 धावांनी पराभूत केलं. पावसामुळे पाकिस्तानला सुधारित आव्हान देण्यात आलं होतं. वर्ल्ड कपमध्ये भारत पाक पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने सेमीफायनलला प्रवेश केल्यास त्यांची गाठ भारताशी पडू शकते.
पाकिस्तानने गेल्या तीन सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर त्यांचे मनोबल उंचावले आहे. भारताविरुद्ध दिसलेला पाकिस्तानचा संघ आणि त्यानंतर खेळलेला संघ यात बराच फरक दिसला. पाकिस्तानने उर्वरित सामन्यात विजय मिळवला तर ते गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर येऊ शकतात.
पाकिस्तानने भारताविरुद्धच्या पराभवातून सावरत जोरदार कमबॅक केलं आहे. लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय मिळवला. त्यानंतर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानला पराभूत केलं आहे. या विजयानंतर पाकिस्तानच्या सेमिफायनलला पोहचण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पाकिस्तानच्या विजयाने यजमान इंग्लंडच्या पुढच्या वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
पाकचे 8 सामन्यात 9 गुण झाले आहेत. जर पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकला तर 11 गुणांसह त्यांना सेमिफायनलला जागा मिळू शकते. पाकिस्तानचे आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 8 सामने झाले आहेत. यातील त्यांचा निकाल हा 1992 च्या पहिल्या 8 सामन्यांप्रमाणेच आहे. पुढची परिस्थिती त्यांना अनुकूल राहिली तर ते सेमिफायनलला पोहचू शकतात. सध्या इंग्लंड चौथ्या क्रमांकावर असून त्यांचे पुढचे सामने न्यूझीलंड आणि भारतासोबत आहेत. यात इंग्लंडचा एका सामन्यात जरी पराभव झाला तरी पाकिस्तानला सेमीफायनलला संधी मिळू शकते.
World Cup : गोलंदाजांच्या कामगिरीने विराटची डोकेदुखी वाढली!
बांगलादेश आणि लंकेच्या पराभवाशिवाय यजमान इंग्लंडच्या जय पराजयावर पाकिस्तानची पुढची वाटचाल ठरणार आहे. सध्या इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचे दोन सामने उरले आहेत. यातील एका सामन्यात इंग्लंडचा पराभव झाल्यास पाचव्या क्रमांकावरील संघ सेमीफायनलला जागा पक्की करू शकतो. इंग्लंडसाठी पुढचे तीनही सामने महत्त्वाचे आहेत. त्यांची गाठ भारत आणि न्यूझीलंडशी पडणार आहे. या दोन्ही देशांविरुद्ध इंग्लंडला 1992 पासून विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे या संघाविरुद्ध इंग्लंडची कामगिरी कशी होते यावर स्पर्धेत कोण राहणार आणि बाहेर कोण पडणार हे समजेल.
भारताने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजला पराभूत केलं आहे. तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसाने रद्द झाला. भारताचे उर्वरित सामने बांगलादेश, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध आहेत. यात भारत नक्कीच सरस आहे. इंग्लंडविरुद्ध भारताचा सामना 30 जूनला होणार आहे. भारताने गुणतक्त्यात पहिले स्थान मिळवल्यास चौथ्या स्थानावर असलेल्या संघासोबत सेमिफायनलला लढत होईल. पाकिस्तानची कामगिरी अशीच राहिल्यास ते चौथ्या स्थानी राहतील. त्यामुळे भारत-पाक सामना पुन्हा बघायला मिळेल.
World Cup : पंतला संधी नाहीच! धोनी आणि शंकरबद्दल काय म्हणाला विराट?
World Cup : शोएब अख्तरचा भारतावर गंभीर आरोप!
एका हातात जनतेचे प्रश्न दुसऱ्या हातात सिगरेट, पाहा काँग्रेस मंत्र्याचा प्रताप