पहिल्याच सामन्यात केएल राहुलची रोहितसोबत विक्रमी भागिदारी!

ICC Cricket World Cup 2019 : केएल राहुलने पहिल्यांदाच सलामीला उतरताना अर्धशतकी खेळी केली. त्याचबरोबर त्याने पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मासोबत शतकी भागिदारी केली.

News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 05:21 PM IST

पहिल्याच सामन्यात केएल राहुलची रोहितसोबत विक्रमी भागिदारी!

मँचेस्टर, 16 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत भारत पाक यांच्यात महामुकाबला होत आहे. यात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी शतकी भागिदारी केली. त्यांनी आतापर्यंत भारताच्या दिग्गज जोड्यांना जे करता आलं नाही ते केलं आहे. शिखर धवनच्या दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने रोहितसोबत ओपनिंग केली. या जोडीने पाकिस्तानविरुद्ध पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी करून विक्रम केला. केएल राहुल आणि रोहित शर्माने 136 धावांची भागिदारी केली.

वर्ल्ड कपमध्ये सचिन-सौरव, सचिन-सेहवाग यांनी भाऱताला नेहमीच चांगली सुरुवात करून दिली आहे. भारताकडून 1996 मध्ये सचिन तेंडुलकर आणि नवज्योतसिंग सिद्धू यांनी 90 धावांची भागिदारी केली होती. या दोघांना मागे टाकून केएल राहुल-रोहित शर्मा यांनी शतकी भागिदारी केली.

ऑस्ट्रेलियाचे धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच यांनी पाकिस्तानविरुद्ध शतकी भागिदारी केली होती. वर्ल्ड कपमध्ये 24 वर्षांनी कोणत्याही सलामीच्या जोडीने पाकिस्तानविरुद्ध 100 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

रोहितनं उतरवली पाकची नशा, हायवोल्टेज सामन्यात झंझावती शतक

आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये सहावेळा सलामीच्या जोड्यांनी पाकिस्तानविरुद्ध 100 धावांपेक्षा जास्त भागिदारी केली आहे. 1979 मध्ये जी ग्रीनिज आणि डी हेन्स यांनी 132 धावांची भागिदारी केली होती. त्यानंतर जी फाउलर आणि सी तवारे यांनी 1983 मध्ये 115 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा आणि डि हेन्स यांनी सर्वाधिक 175 धावांची भागिदारी करून 1992 च्या सामन्यात विजय मिळवून दिला होता. 1996 ला आर स्मिथ आणि एम एथर्टन यांनी 147 धावांची भागिदारी केली होती. त्यानंतर यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये वॉर्नर-फिंच यांनी 146 धावा केल्या होत्या. World Cup India vs Pakistan: येथे पाहा महामुकाबला Live

Loading...


VIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 05:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...