World Cup : शोएब मलिकनंतर 'हा' दिग्गज खेळतोय शेवटचा सामना, जाहीर केली निवृत्ती

ICC Cricket World Cup पाकिस्तानच्या शोएब मलिकनंतर आता आफ्रिकेच्या इम्रान ताहिरने निवृत्ती जाहिर केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2019 06:49 PM IST

World Cup : शोएब मलिकनंतर 'हा' दिग्गज खेळतोय शेवटचा सामना, जाहीर केली निवृत्ती

मँचेस्टर, 06 जुलै : ICC Cricket World Cup स्पर्धेतील साखळी सामने शनिवारी संपणार आहेत. शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. शुक्रवारी झालेल्या पाकिस्तान बांगलादेश सामन्यातनंतर पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्यानंतर आता आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज इम्रान ताहिरने निवृत्ती जाहिर केली आहे.

वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा सामना सुरू आहे. या सामन्यानंतर इम्रान ताहिर निवृत्ती घेणार आहे. पाकिस्तानमध्ये जन्म झालेल्या इम्रानने 106 सामने खेळले आहेत. सध्या तो जगातील सर्वोत्तम फिरकीपटू म्हणून ओळखला जातो. त्याने ट्विटरवरून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानं म्हटलं की, एका संघाप्रमाणे मीसुद्धा वर्ल्ड कपमधून निवृत्त होणार आहे. सध्या खूप भावूक आहे. या सामन्यातून क्रिकेटला गुडबाय म्हणणं कठीण आहे असंही ताहिर म्हणाला.

इम्रान ताहिरने क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याच्या सोबत राहिलेल्या लोकांचे आभार मानले. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाला त्याचं स्वप्न पूर्ण करण्याबद्दल आभार मानलं. ताहिर म्हणाला की, मला आता संघाची काळजी घेण्याची आवश्यकता नाही. संघात युवा खेळाडू येत आहेत. त्यांना संधी मिळाल्यास ते नक्कीच चांगली कामगिरी करतील.

Loading...

आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळण्यापूर्वी ताहिर मैदानात आला तेव्हा त्याच्या साथीदारांनी त्याला अनोखी मानवंदना दिली. या वर्ल्ड कपमध्ये ताहिर असा फिरकीपटू आहे ज्यानं पहिल्याच सामन्यात पहिलं षटक टाकून दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतली होती. मात्र, त्या सामन्यात आफ्रिकेचा पराभव झाला होता.

VIDEO: धोनीला पाहायचंय? या ठाण्याच्या मॉलमध्ये!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 06:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...