अखेरच्या World Cup सामन्यात युनिव्हर्सल बॉसला मोडता आला नाही हा विक्रम!

अखेरच्या World Cup सामन्यात युनिव्हर्सल बॉसला मोडता आला नाही हा विक्रम!

ICC Cricket World Cup मधील अखेरचा सामना खेळत असलेल्या गेलला ब्रायन लाराचा विक्रम मोडण्यासाठी 11 धावा कमी पडल्या.

  • Share this:

हेडिंग्ले, 04 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज अफगाणिस्तानविरुद्ध फक्त 7 धावांवर बाद झाला. वर्ल्ड कपमधील हा त्याचा शेवटचा सामना होता. यात मोठी खेळी करण्यात अपयश आलं असलं तरी आतापर्यंत त्याच्या फटकेबाजीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. ख्रिस गेल वर्ल्ड कपनंतर निवृत्ती जाहीर करणार आहे. सध्या 39 वर्षाचा असलेल्या गेलने 1999 मध्ये भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून पदार्पण केलं होतं.

वर्ल्ड कपच्या आधी गेलने सांगितलं होतं की, आपण स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. मात्र, पुन्हा भारताविरुद्धच्या मालिकेत खेळणार असल्याचं तो म्हटला होता. वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या मालिकेत घरच्या मैदानावर तो निवृत्ती घेऊ शकतो.

अफगाणिस्तानविरुद्ध गेलला 18 चेंडूत 7 धावा करता आल्या. यात त्याने एक चौकार मारला. गेल बाद झाल्यानंतर चाहते निराश झाले पण तो पॅव्हेलियनकडे परत जात असताना टाळ्या वाजवून त्याला अभिवादन केलं. गेलनेसुद्धा बॅट उंचावत चाहत्यांना अभिवादन केलं. सामन्यापूर्वी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनीसुद्धा त्याला शेवटच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. 2019 च्या वर्ल़्डकपमध्ये त्याला 9 सामन्यात फक्त 242 धावा करता आल्या. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. वर्ल्ड कपमध्ये त्याने 26 चौकार आणि 12 षटकार मारले.

वर्ल्ड कपमधील शेवटच्या सामन्यात 7 धावांवर बाद झालेला गेल वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराच्या विक्रमापासून 11 धावा दूर राहिला. ब्रायन लाराच्या नावावर वेस्ट इंडिजकडून 295 सामन्यात 10 हजार 348 धावा करण्याचा विक्रम आहे. तर गेलने 264 सामन्यात 10 हजार 338 धावा केल्या आहेत. दोघांनीही प्रत्येकी चार सामने वर्ल्ड इलेव्हनसाठी खेळले असून यासह 299 सामन्यात लाराच्या 10 हजार 405 तर गेलच्या 298 सामन्यात 10 हजार 393 धावा झाल्या आहेत. दोघांनीच वेस्ट इंडिजकडून खेळताना 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

गेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द 20 वर्षांची असून यात त्याने 103 कसोटीत 15 शतके आणि 37 अर्धशतकांसह 7 हजार 214 धावा केल्या आहेत. तर 298 एकदिवसीय सामन्यात 10 हजार 393 धावा झाल्या आहेत. याशिवाय 58 टी 20 मध्ये 2 शतक आणि 13 अर्धशतकांसह 1 हजार 627 धावा झाल्या आहेत.

गेल असा एकमेव फलंदाज आहे ज्यानं टी 20 मध्ये शतक, वनडेत द्विशतक आणि कसोटीत त्रिशतक केलं आहे. अशी कामगिरी आतापर्यंत एकाही फलंदाजाला करता आलेली नाही.

World Cup: सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला करावा लागेल हा चमत्कार!

मोठी बातमी, वर्ल्ड कपमधील शेवटच्या सामन्यात धोनी करणार क्रिकेटला अलविदा?

SPECIAL REPORT: यशस्वी कॅप्टन कूल धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 05:30 PM IST

ताज्या बातम्या