World Cup : पाकिस्तानचा बांगलादेशवर 94 धावांनी विजय

पाकिस्तानच्या सेमीफानलला पोहचण्याच्या आशा संपुष्टात आल्या असून न्यूझीलंडने आपलं स्थान पक्कं केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2019 10:42 PM IST

World Cup : पाकिस्तानचा बांगलादेशवर 94 धावांनी विजय

लंडन, 05 जुलै: ICC Cricket World मध्ये पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 314 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशनं 221 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीच्या माऱ्यासमोर बांगलादेशचा डाव गडगडला. शाकिब अल हसन वगळता इतर फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. शाकिबने 64 धावा केल्या. पाकिस्तानने 94 धावांनी सामना जिंकून 11 गुण मिळवले. मात्र, धावगतीच्या जोरावर न्यूझीलंडने बाजी मारली. बांगलादेशविरुद्ध शाहिन आफ्रिदीने 6 गडी बाद केले. त्याच्या जोरावर पाकने बांगलादेशला 44 षटकांत 221 धावांत रोखलं.

तत्पूर्वी, इमाम उल हकचे शतक आणि बाबर आझमच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने बांगलादेशसमोर 315 धावांचं आव्हान उभा केलं. बाबर आझमचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले तर इमाम उल हक हिट विकेट बाद झाला. कर्णधार सर्फराज अहमदला दुखापतीनं मैदान सोडावं लागलं. बांगालादेशच्या मुस्तफिझुर रहमानने 4, सैफुद्दीनने 3 गडी बाद केले तर मेहंदी हसनने 1 गडी बाद केला.

पाकिस्तानला सेमीफायनलला पोहचण्यासाठी बांगलादेशला 7 धावांत गुंडाळण्याची गरज होती. मात्र, बांगलादेशच्या फलंदाजांनी दुसऱ्याच षटकात 7 धावा करून पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आणलं.इंग्लंडनंंतर न्यूझीलंडनंही सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यामुळं पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडलं आहे.

Loading...

वेस्ट इंडिजनं बिघडवला पाकिस्तानचा खेळ

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे प्रदर्शन वाईट राहिले आहे. पहिल्याच सामन्यात त्यांना पराभवाचा फटका बसला होता. वेस्ट इंडिजनं 7 विकेटनं पाकला नमवले होते. पाकिस्तानचा संघ केवळ 105 धावात बाद झाला होता. त्यामुळं पाकिस्तानचा रनरेट मायन्समध्ये गेला. त्यानंतर भारत, ऑस्ट्रेलिया यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला. तर, श्रीलंकेच्या संघाविरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला.

वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीच्या सामन्यात खराब प्रदर्शन करणाऱ्या पाकिस्तान संघाला बांग्लादेशविरोधात लढण्याआधी गेल्या चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. जर पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी 316 धावांनी विजय मिळवावा लागणार होता. यावर सर्फराज अहमदनं अजब विश्वास व्यक्त केला होता, "जर अल्लाहच्या मनात असेल तर चमत्कार होईल. ते असे आहे की 600, 500, 400 धावा करून त्याच मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला 50 धावांत बाद केल्यानंतरच 136 धावांच्या फरकाने विजय मिळवता येईल".

वाचा- पाकचा कर्णधार बावळट त्यात संघ भित्रा, शोएब अख्तर पुन्हा भडकला

वाचा- 'अरे तुझ्या तोंडापेक्षा बूट मोठा आहे', रोहितनं घेतली चहलची फिरकी

वाचा- World Cup : इंग्लंडमध्ये सुरक्षित नाही भारतीय संघ, ICCने केले हात वर

World Cup: भर मैदानात निर्वस्त्र शिरला चाहता, सामन्यात घातला धिंगाणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 10:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...