रोनाल्डो आणि सौम्या सरकार भाऊ-भाऊ? आयसीसीने शेअर केला फोटो

रोनाल्डो आणि सौम्या सरकार  भाऊ-भाऊ? आयसीसीने शेअर केला फोटो

ICC Cricket World Cup 2019 : ऑस्ट्रेलिया बांगलादेश यांच्यातील सामन्यानंतर आयसीसीने रोनाल्डो आणि सौम्या सरकार यांचा फोटो शेअर केला आहे.

  • Share this:

नॉटिंगहम, 21 जून : बांगलादेशचा गोलंदाज सौम्या सरकार आणि पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यात खरंतर दूर दूरपर्यंत काही संबंध नाही. तरीही ते दोघे भाऊ-भाऊ असून जन्मावेळी ते वेगळे झाले होते का? असं आयीसीसने विचारलं आहे. दोघेही त्यांच्या देशाचे स्टार खेळाडू आहेत. इतक्या वर्षांनी ते भेटले कसे असाही प्रश्न पडेल पण तसं नाही.

आयसीसीने रोनाल्डो आणि सौम्या सरकारचा एक फोटो शेअर केला आहे. आयसीसीने ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यावेळी सौम्या सरकारचा जल्लोष पाहून रोनाल्डो आणि सरकार यांच्यात भावा-भावाचं नातं आहे का? असं विचारलं आहे. सौम्या सरकारने त्याच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील दुसरी विकेट घेतली. त्याने अॅरॉन फिंचला 21 व्या षटकात बाद केलं. या विकेटनंतर सौम्या सरकारने अनोखं सेलिब्रेशन केलं. त्याने पहिल्यांदा उडी मारली, त्यानंतर फिरला आणि स्प्रेड इगल स्टाईल पुन्हा जमीनीवर उडी मारली.

सौम्या सरकारने ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं आहे ते ख्रिस्तियानो रोनाल्डो नेहमी करतो तसंच आहे. आयसीसीने सौम्या सरकारचा हा फोटो रोनाल्डोच्या फोटोसोबत शेअर केलं आहे. दोघेही एकाच पद्धतीने उडी मारताना यात दिसत आहेत. अर्थात रोनाल्डोच्या चाहत्यांना ही तुलना म्हणजे अतिशयोक्ती वाटू शकते. काही चाहत्यांनी आयसीसीला ही पोस्ट डिलीट करण्यास सांगितलं आहे.

वाचा- विराटसाठी आनंदाची बातमी, वर्ल्ड कप गाजवणारा अष्टपैलू खेळाडू फिट

वाचा- वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या विराटसेनेचं रुप पालटलं, PHOTO व्हायरल

वाचा- ...म्हणून पाक संघानं ऐकला नाही PM इमरान यांचा सल्ला

सानियासाठी 'रावळपिंडी एक्स्प्रेस' उतरली मैदानात, ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2019 04:40 PM IST

ताज्या बातम्या