मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Women's World Cup : दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा टीम इंडियाला फायदा, वाचा सेमी फायनलचं समीकरण

Women's World Cup : दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा टीम इंडियाला फायदा, वाचा सेमी फायनलचं समीकरण

फोटो - @ICC

फोटो - @ICC

महिला वर्ल्ड कपमधील (Women's World Cup 2022) गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं यजमान न्यूझीलंडचा 2 विकेट्सनं पराभव केला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा टीम इंडियाला फायदा होणार आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 17 मार्च : महिला वर्ल्ड कपमधील (Women's World Cup 2022) गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं यजमान न्यूझीलंडचा 2 विकेट्सनं पराभव केला. हॅमिल्टनमध्ये झालेल्या या मॅचमध्ये न्यूझीलंडची टीम पहिल्यांदा बॅटींग करताना 47.5 ओव्हर्समध्ये 228 रनवर ऑल आऊट झाली. आफ्रिकेनं 228 रनचं आव्हान 2 विकेट्स आणि 3 बॉल राखून पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात ऑल राऊंडर मारिजाने कँपचे महत्त्वाचे योगदान होते. तिने 10 ओव्हर्समध्ये 44 रन देत 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर दबावात 34 रनची नाबाद खेळी केली. दक्षिण आफ्रिकेच्या न्यूझीलंडवरील विजयाचा टीम इंडियाला मोठा फायदा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेनं या स्पर्धेतील चारही मॅच जिंकल्या आहेत. तर न्यूझीलंडनं पाचपैाकी तीन मॅच गमावल्या आहेत. न्यूझीलंडनं आजच्या मॅचमध्ये विजय मिळवला असता तर भारतीय टीमची (Team India Women) पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर घसरण झाली असती, पण तसं झालं नाही. भारतीय टीम अजूनही तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. कसा आहे पॉईंट टेबल? महिला वर्ल्ड कपमधील 16 मॅचनंतर ऑस्ट्रेलियन टीम चार मॅचमध्ये 4 विजयासह पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेनंही सर्व चार मॅच जिंकल्या आहेत. पण त्यांचा रनरेट ऑस्ट्रेलियापेक्षा थोडा कमी असल्यानं ही टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय टीमनं चार मॅचमध्ये दोन मॅच जिंकल्या आहेत. टीम इंडियाचा रनरेट  +0.632 आहे. न्यूझीलंडचा तिसऱ्या पराभवानंतर मायनसमध्ये रनरेट गेला आहे. यजमान टीमचा रनरेट -0.216 आहे. भारतासमोर वेस्ट इंडिजचंही आव्हान आहे. वेस्ट इंडिजनं 4 पैकी 2 मॅच जिंकल्या आहेत. आता त्यांचे उर्वरित तीन पैकी दोन सामने हे पाकिस्तान आणि बांगलादेश या कमकुवत टीम विरूद्ध होणार आहेत. जगभरातील फजितीनंतर पाकिस्तानचा अखेरचा उपाय, लाहोर टेस्टपूर्वी घेतला मोठा निर्णय भारताच्या आता ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरूद्ध मॅच आहेत. सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाला उर्वरित 3 पैकी 2 मॅच जिंकणे आवश्यक आहे. जर टीम इंडियानं 3 पैकी 2 सामने गमावले तर टॉप 4 मध्ये येण्याची शक्यता कमी होईल. त्या परिस्थितीमध्ये सध्या चारपैकी एक मॅच जिंकलेल्या इंग्लंडला संधी मिळू शकते. त्यामुळे भारतीय टीमला सेमी फायनला प्रवेश निश्चित करण्यासाठी आणखी किमान दोन सामने चांगल्या रनरेटनं जिंकणे आवश्यक आहे.
First published:

Tags: Cricket news, New zealand, South africa, Team india

पुढील बातम्या