मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Women's World Cup : पाकिस्तानचा सलग तिसरा पराभव, शेवटच्या ओव्हरमध्ये गमावली मॅच

Women's World Cup : पाकिस्तानचा सलग तिसरा पराभव, शेवटच्या ओव्हरमध्ये गमावली मॅच

आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (ICC Women's World Cup 2022) शुक्रवारी पाकिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका (Pakistan Women vs South Africa Women) यांच्यात सामना झाला.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 11 मार्च : आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (ICC Women's World Cup 2022) शुक्रवारी पाकिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका (Pakistan Women vs South Africa Women) यांच्यात सामना झाला. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचा 6 रननं पराभव केला. आफ्रिकेचा या स्पर्धेतील दुसरा विजय आहे. त्यांनी यापूर्वी बांगलादेशचा पराभव केला होता. तर पाकिस्तानचा सलग तिसरा पराभव आहे. यापूर्वी या टीमला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी पराभूत केले होते. सलग तीन पराभवानंतर पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदा बॅटींग करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 224 रनचं टार्गेट ठेवलं होतं. त्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची टीम 49.5 ओव्हर्समध्ये 217 रनवर ऑल आऊट झाली. या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला विजयासाठी 10 रन हवे होते आणि त्यांच्या 2 विकेट्स बाकी होत्या. आफ्रिकेकडून शबनिम इस्माइलनं शेवटची ओव्हर टाकली. तिच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर 2 रन निघाले. त्यामुळे पाकिस्तान विजयाच्या जवळ आले होते. त्यानंतर इस्माइलनं पुढच्या बॉलवर डायना बेगला आऊट करत पाकिस्तानला 9 वा धक्का दिला. इस्माइलच्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलरवर एक रन निघाला. चौथा बॉल निर्धाव पडला. त्यानंतर ओव्हरमधील शेवटून दुसऱ्या बॉलवर इस्माइलनं विकेट घेत आफ्रिकेचे विजयावर शिक्कामोर्तब केले. IPL 2022 : लसिथ मलिंगाची नवी इनिंग, 'यॉर्कर किंग' बनला या टीमचा कोच! महिला वर्ल्ड कपमध्ये शनिवारी भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India Women vs West Indies Women) यांच्यात होत आहे. न्यूझीलंड विरूद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाची टॉप 4 मधील जागा गेली आहे. तर वेस्ट इंडिजचनं पहिल्या मॅचमध्ये न्यूझीलंडचा आणि नंतर इंग्लंडचा पराभव करत वर्ल्ड कपची दमदार सुरूवात केली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजचं आव्हान पार करण्यासाठी टीम इंडियाला कामगिरीमध्ये मोठी सुधारणा करावी लागणार आहे.
First published:

Tags: Cricket news, Pakistan, South africa

पुढील बातम्या