Home /News /sport /

Women’s IPL T20: ट्रेलब्लेझर्सनी मोडलं सुपरनोवाजचं स्वप्न, पहिल्यांदाच जिंकली ट्रॉफी

Women’s IPL T20: ट्रेलब्लेझर्सनी मोडलं सुपरनोवाजचं स्वप्न, पहिल्यांदाच जिंकली ट्रॉफी

स्मृती मंधानाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ट्रेलब्लेझर्सनी लागोपाठ तिसऱ्यांदा सुपरनोवाजचं महिला टी-20 चॅलेंज जिंकण्याचं स्वप्न मोडलं आहे. ट्रेलब्लेझर्सनी सुपरनोवाजला 16 रननी मात देऊन पहिल्यांदाच महिला आयपीएल फायनलवर आपलं नाव कोरलं.

    दुबई, 9 नोव्हेंबर : स्मृती मंधाना (Smriti Mandhana) च्या नेतृत्वात खेळणाऱ्या ट्रेलब्लेझर्स (Trailblazers) नी लागोपाठ तिसऱ्यांदा सुपरनोवाज (Supernovaj) चं महिला टी-20 चॅलेंज जिंकण्याचं स्वप्न मोडलं आहे. ट्रेलब्लेझर्सनी सुपरनोवाजला 16 रननी मात देऊन पहिल्यांदाच महिला आयपीएल फायनलवर आपलं नाव कोरलं. पहिले बॅटिंग करणाऱ्या ट्रेलब्लेझर्सने कर्णधार स्मृती मंधानाच्या शानदार खेळीमुळे 8 विकेट गमावून 118 रन केले. हरमनप्रीत कौरच्या सुपरनोवाजला या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही. ट्रेलब्लेझर्सच्या बॉलरनी सुपरनोवाजच्या महिलांना मैदानात टिकूच दिलं नाही. त्यामुळे सुपनोवाजने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 102 रन केले. कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 30 रन केले. तर ट्रेलब्लेझर्सकडून सलमा खातूनने 18 रन देऊन 3 विकेट आणि दीप्ती शर्माने 9 रन देऊन 2 विकेट घेतल्या, तर सोफीला एक विकेट घेण्यात यश आलं. डॉटिन मंधानाची मजबूत सुरुवात ट्रेलब्लेझर्सने या मॅचमध्ये पहिले बॅटिंग करत मजबूत सुरुवात केली. स्मृती मंधाना आणि डिएंट्रा डॉटिन यांच्यात 71 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली, पण पूनम यादवने डॉटिनला आऊट केलं. यानंतर ट्रेलब्लेझर्स यांची बॅटिंग गडगडली. मंधानाने 68 रनची खेळी केली, पण सिरिवर्धनेने मंधनाला आऊट करुन ट्रेलब्लेझर्सना 101 रनवर दुसरा धक्का दिला. राधा यादवने घेतल्या 5 विकेट यानंतर कोणत्याही खेळाडूला सुपरनोवाजच्या बॉलिंगपुढे टिकता आलं नाही. ट्रेलब्लेझर्सने 20 ओव्हरमध्ये 118 रनच करता आले. राधा यादवने 5 विकेट घेत 16 रन दिल्या. तर पूनम यादव, शशिकला यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. मंधानाने 49 बॉलमध्ये 5 फोर आणि 3 सिक्स मारून 68 रन केले. तर ऋचा घोष 10 रन, दीप्ती शर्मा 9 रन, हरलीन देओल 4 रन सोफी आणि झूलन गोस्वामी यांनी एक-एक रन केली
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या