BCCI ला दुपारी 2 वाजता झाली जगातल्या अव्वल महिला क्रिकेटरच्या वाढदिवसाची आठवण!

भारताच्या पुरुष क्रिकेटपटूंना मध्यरात्रीच शुभेच्छा देणाऱ्या बीसीसीआय़ला महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या वाढदिवसाला मात्र दुपार होण्याची वाट बघावी लागली.

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 01:20 PM IST

BCCI ला दुपारी 2 वाजता झाली जगातल्या अव्वल महिला क्रिकेटरच्या वाढदिवसाची आठवण!

मुंबई, 19 जुलै : भारताचा महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा 18 जुलैला वाढदिवस झाला. त्याआधी भारत सरकारने तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं. सध्या महिला क्रिकेटमध्ये अव्वल फलंदाज असलेल्या स्मृतीच्या वाढदिवसाचा बीसीसीआयला मात्र विसर पडला. सकाळपासून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असलेल्या स्मृतीला बीसीसीआयनं दुपारी शुभेच्छा दिल्या.

बीसीसआयनं स्मृती मानधनाला दुपारी 2 वाजल्यानंतर शुभेच्छा दिल्या. त्याच बीसीसीआयने धोनीच्या वाढदिवसाच्या आदल्यादिवशी खास व्हिडिओ तयार केला होता. वाढदिवसाला 7 जुलै रोजी 12 वाजताच शुभेच्छा दिल्या. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनाही सकाळी 10 वाजता शुभेच्छा दिल्या होत्या.

स्मृती मानधनाने गेल्या वर्षी 12 सामन्यात 669 धावांचा पाऊस पाडला. तिने 25 टी20 सामन्यात 622 धावा काढल्या आहेत. मानधनाला 2018 मध्ये आयसीसीचा महिला एकदिवसीय प्लेयरचा पुरस्कार मिळाला होता. बीसीसीआयनेसुद्धा तिला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू पुरस्कार दिला आहे.

Loading...

आयसीसीने तिला सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू आणि वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून गौरवलं आहे. भारताची सर्वात कमी वयात टी20 क्रिकेट संघाची कर्णधार झाली होती.

स्मृती मानधनानं क्रिकेटपटू होऊ नये असं तिच्या आईला वाटत होतं. त्याऐवजी तिनं टेनिस किंवा इतर कोणताही खेळ निवडावा असं तिला वाटत होतं. मात्र, क्रिेकेटवरचं तिचं प्रेम पाहून आईचा विरोध मावळला.

आतापर्यंत स्मृतीने 50 एकदिवसीय सामन्यात 1 हजार 951 धावा झाल्या आहेत. यात तिने 4 शतकं आणि 10 अर्धशतकं केली आहेत. तर टी20 मध्ये 58 सामन्यातील 56 डावात 1 हजार 298 धावा केल्या आहेत.

इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्याचा न्यूझीलंड करणार सन्मान!

मास्टर ब्लास्टरच्या शिरपेचात मानाचा तुरा, ICCनं 'हा' सन्मान देऊन केला गौरव

फेसबुकवर FaceApp Challengeची धूम; काय आहे चॅलेंज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 12:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...