मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Women World Cup : टीम इंडियाचा चुरशीच्या लढतीमध्ये विजय, सर्वात मोठी डोकेदुखी दूर

Women World Cup : टीम इंडियाचा चुरशीच्या लढतीमध्ये विजय, सर्वात मोठी डोकेदुखी दूर

न्यूझीलंडमध्ये पुढील महिन्यात महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा (Women's Cricket World Cup 2022) होणार आहे. टीम इंडियानं (Indian Women Cricket Team) स्पर्धेची तयारी जोरदार सुरू केली आहे.

  मुंबई, 27 फेब्रुवारी : न्यूझीलंडमध्ये पुढील महिन्यात महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा (Women's Cricket World Cup 2022) होणार आहे. टीम इंडियानं (Indian Women Cricket Team) स्पर्धेची तयारी जोरदार सुरू केली आहे. दक्षिण आफ्रिका विरूद्ध झालेल्या पहिल्या वॉर्म-अप मॅचमध्ये भारतानं 2 रननं निसटता विजय मिळवला. टीम इंडियानं पहिल्यांदा बॅटींग करताना निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 9 आऊट 244 रन केले होते. त्यानंतर भारतीय बॉलर्सनी आफ्रिकेला 7 आऊट 242 रनवर रोखत विजय मिळवला आहे. भारताकडून या मॅचमध्ये हरनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) शतक झळकावलं. हरमननं 114 बॉलमध्ये 103 रनची खेळी केली. गेल्या काही दिवसांमध्ये खराब फॉर्ममुळे हरमननवर टीका होत होती. तिच्या टीममधील जागेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. न्यूझीलंड विरूद्धच्या शेवटच्या वन-डेमध्ये तिने अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर वॉर्मअप मॅचमध्ये शतक झळकावले. हरमन फॉर्ममध्ये परतल्यानं टीम इंडियाची मोठी डोकेदुखी दूर झाली आहे.
  भारताची कॅप्टन मिताली राज या मॅचमध्ये अपयशी ठरली. ती शून्यावर आऊट झाली. यास्तिका भाटियानं 58 रनची खेळी केली. याशिवाय ऋचा घोष (11), स्नेह राणा (14) आणि पूजा वस्त्रकार (16) यांनीच दोन अंकी रन केले. IPL 2022 : 'या' दोन टीमच्या लढतीनं सुरू होणार आयपीएल, राज्यात स्पर्धेसाठी खास व्यवस्था दक्षिण आफ्रिकेकडून कॅप्टन सून लूसनं सर्वाधिक 94 रन केले. तर ओपनर लॉरा वोल्वार्टनं 75 रनची खेळी केली. टीम इंडियाकडून या मॅचमध्ये 7 जणींनी बॉलिंग केली. यामध्ये राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gaikwad) सर्वात यशस्वी बॉलर ठरली. राजेश्वरीनं 4 विकेट्स घेतल्या. मेघना सिंह, स्नेह राणा आणि पूनम यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. टीम इंडियाची पुढील वॉर्म-अप मॅच 1 मार्च रोजी वेस्ट इंडिज विरूद्ध होणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket, South africa, Team india

  पुढील बातम्या