Home /News /sport /

फायनलमध्ये पराभवानंतर स्मृती मंधाना भावुक, चाहत्यांची मागितली माफी

फायनलमध्ये पराभवानंतर स्मृती मंधाना भावुक, चाहत्यांची मागितली माफी

भारताच्या महिला क्रिकेट संघाला टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. यानंतर भावुक झालेल्या स्मृती मंधानाने चाहत्यांची माफी मागितली.

  मुंबई, 11 मार्च : महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात पहिल्यांदाच धडक मारली होती. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला 85 धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने सलग पाचव्यांदा जगज्जेतेपद पटकावलं. भारताला मिळालेली ही संधी थोडक्यात हुकली. या पराभवानंतर भारताची सलामीची फलंदाज स्मृती मंधानाने Instagramवर पोस्टमधून भावना व्यक्त केल्या आहेत. यात तिनं सर्व चाहत्यांचे आभार मानले असून देशवासीयांची माफीही मागितली आहे. आपण वर्ल्ड कप जिंकू न शकल्याचं दु:ख तिनं व्यक्त केलं. स्मृती मंधाना म्हणाली की, 'मी त्या सर्वांचे आभार मानू इच्छिते ज्यांनी 8 मार्चली मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आम्हाला प्रोत्साहन दिलं. आम्हाला जिंकता आलं नाही मात्र जो पाठिंबा चाहत्यांनी दिला त्यामुळे मन भरून आलं आहे. यापुढेही असाच पाठिंबा मिळत राहू दे.'
  ''संपूर्ण संघ कठोर परिश्रम करून या वर्ल्ड कपमध्ये पोहोचला होता. त्याचं कौतुक करण्याची इच्छा आहे. आमच्या युवा संघाचा अभिमान वाटतो आणि संघाच्यावतीने मी एक वचन देते की आणखी मेहनत करून आम्ही पुन्हा नव्या दमाने खेळू आणि जिंकू'',असंही स्मृतीने सांगितलं. महिला टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात शेफालीला  फक्त 2 धावाच करता आल्या. ती बाद झाल्यानंतर इतर दिग्गज फलंदाजही मैदानावर फक्त हजेरी लावून परतले. दिप्ति शर्माने केलेल्या खेळीमुळे भारत 99 धावा तरी करू शकला. तिच्याशिवाय एकही फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यासमोर फार काळ तग धरू शकला नाही. हे वाचा : धोनीसाठी IPL ही शेवटची संधी, टीम इंडियात परतण्यासाठी पूर्ण करावी लागेल ‘ही’ अट आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला अंतिम सामना भारताने 85 धावांनी गमावला. या पराभवासह पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. तर, ऑस्ट्रेलियानं तब्बल 5 वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रम केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 99 धावांवर ढेपाळला. पाहा VIDEO : मास्टर ब्लास्टरची खिलाडूवृत्ती, पंचांनी बाद देण्याआधी सचिनने सोडलं मैदान
  Published by:Suraj Yadav
  First published:

  Tags: Cricket, Smriti mandhana

  पुढील बातम्या