मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पिच वाचवण्यासाठी खेळाडूंनी केलं असं काही... VIDEO पाहून वाटेल अभिमान

पिच वाचवण्यासाठी खेळाडूंनी केलं असं काही... VIDEO पाहून वाटेल अभिमान

ऑस्ट्रेलियात (Australia) सध्या 50 ओव्हर्सची महिला नॅशनल क्रिकेट लीग टूर्नामेंट (Women National Cricket League) सुरू आहे. या स्पर्धेतील तिसरी मॅच खराब हवामानामुळे प्रभावित झाली. पण, या मॅचमधील एका प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 20 डिसेंबर : कोणत्याही क्रिकेटच्या मॅचमध्ये पिच हे खूप महत्त्वाचे असते. चांगला खेळ होण्यासाठी पिच चांगले राहणे हे आवश्यक असते. ऑस्ट्रेलियात (Australia) सध्या 50 ओव्हर्सची महिला नॅशनल क्रिकेट लीग टूर्नामेंट (Women National Cricket League) सुरू आहे. या स्पर्धेतील तिसरी मॅच खराब हवामानामुळे प्रभावित झाली. पण, या मॅचमधील एका प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया वूमेन्स या टीममधील मॅलबर्नमध्ये झालेल्या मॅचमध्ये हा प्रकार घडला.

या मॅचमधील दुसऱ्या इनिंगला खराब हवामानाचा अडथळा आला.  दुसरी इनिंग सुरू असताना आकाशात काळे ढग दाटले. त्यामुळे खेळ थांबवावा लागला. ग्राऊंडसमननी पिचला वाचवण्यासाठी कव्हर घेऊन मैदानात आले. पण, त्यावेळी वारा जोरात वाहत होता. त्यामुळे कव्हर्स लावण्यासाठी आणखी काही जणांची आवश्यकता होती. ते पाहताच आतमध्ये गेलेल्या महिला खेळाडूंनी तातडीनं मैदानात धाव घेतली आणि त्यांनी या कर्मचाऱ्यांची मदत केली.

महिला खेळाडूंनी केलेल्या या अनोख्या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. या मॅचमध्ये व्हिक्टोरिया टीमनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला होता. न्यू साऊथ वेल्सनं निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 300 रन केले. खराब हवामानामुळे व्हिक्टोरियाला मॅच जिंकण्यासाठी 35 ओव्हर्समध्ये 256 रनचे टार्गेट मिळाले.

IND vs SA: 'बॉक्सिंग डे' टेस्टसाठी 'क्रिकेट दक्षिण आफ्रिके'चा मोठा निर्णय!

व्हिक्टोरियाला निर्धारित ओव्हर्समध्ये 229 रन करता आले. त्यामुळे न्यू साऊथ वेल्सनं 25 रननं ही मॅच जिंकली. व्हिक्टोरियाची एलिस पेली (Ellyse Perry) 'प्लेयर ऑफ द मॅच' ठरली. तिने सुरुवातीला 10 रन देत एक विकेट घेतली. त्यानंतर 94 बॉलमध्ये 120 रनची खेळी केली.

First published:

Tags: Australia, Cricket, Video Viral On Social Media