IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजआधी या खेळाडूचा सोशल मीडियाला रामराम!

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजआधी या खेळाडूचा सोशल मीडियाला रामराम!

आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. पण या महत्त्वाच्या सीरिजआधी ऑस्ट्रेलियाचा उदोयन्मुख खेळाडू विल पुकोवस्की (Will Pucovski) याने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे.

  • Share this:

सिडनी, 14 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये भारत 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. 27 नोव्हेंबरपासून या सीरिजला सुरुवात होणार आहे. पण या महत्त्वाच्या सीरिजआधी ऑस्ट्रेलियाचा उदोयन्मुख खेळाडू विल पुकोवस्की (Will Pucovski) याने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. टेस्ट सीरिजआधी होणारी वक्तव्य आणि बातम्यांचा भडीमार टाळण्यासाठी पुकोवस्कीने सोशल मीडियाची अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेफील्ड शिल्डमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या विल पुकोवस्की याची ऑस्ट्रेलियात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे लक्ष भरकटण्यापासून वाचण्यासाठी पुकोवस्कीने सोशल मीडियापासून फारकत घेतली आहे.

काय म्हणाला पुकोवस्की?

'मीडियामध्ये या सीरिजची खूपच चर्चा सुरू आहे. मी माझ्या तयारीवर संपूर्णपणे लक्ष केंद्रीत करू इच्छितो, त्यामुळे ट्विटर आणि सोशल मीडियापासून लांब जाण्याचं मी ठरवलं. यापासून लांब राहिल्यामुळे माझं काम सोपं होईल,' असं पुकोवस्की म्हणाला.

विल पुकोवस्की ने छोड़ा सोशल मीडिया (साभार-पुकोवस्की इंस्टाग्राम)

पुकोवस्की आणि कॅमरुन ग्रीन यांच्यासह पाच नवीन खेळाडूंना ऑस्ट्रेलियाने 17 खेळाडूंच्या टीममध्ये संधी दिली आहे. पुकोवस्कीने शेफील्ड शिल्डमध्ये लागोपाठ दोन द्विशतकं केली होती. शाळेमध्ये असताना फूटबॉल खेळताना पुकोवस्कीच्या डोक्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याने मेहनत करुन क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.

पुकोवस्की पाकिस्तानविरुद्धच्या मागच्या वर्षी होणाऱ्या टेस्टमधूनच पदार्पण करणार होता, पण डिप्रेशनमुळे त्याने सीरिजमधून नाव मागे घेतलं. 2019 साली फेब्रुवारी महिन्यातच पुकोवस्कीची श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी निवड झाली होती, पण याचवेळी तो मानसिक दडपणाखाली आला, त्यामुळे त्याला टीममधून बाहेर ठेवण्यात आलं. आता मात्र पुकोवस्की खेळण्यासाठी तयार आहे आणि फॉर्ममध्येही आहे.

Published by: Shreyas
First published: November 14, 2020, 9:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या