• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • पोलार्ड आणि ब्राव्होची पॉवर, वेस्ट इंडिजनं केला आफ्रिकेचा पराभव

पोलार्ड आणि ब्राव्होची पॉवर, वेस्ट इंडिजनं केला आफ्रिकेचा पराभव

कॅप्टन कायरन पोलार्डचे (Kieron Pollard) अर्धशतक आणि ड्वेव ब्राव्होच्या (Dwayane Bravo) भेदक बॉलिंगमुळे वेस्ट इंडिजनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे.

  • Share this:
    मुंबई, 2 जुलै: कॅप्टन कायरन पोलार्डचे (Kieron Pollard) अर्धशतक आणि ड्वेन ब्राव्होच्या (Dwayane Bravo) भेदक बॉलिंगमुळे वेस्ट इंडिजनं दक्षिण आफ्रिकेचा (West Indies vs South Africa) 21 रननं पराभव केला. या विजयाबरोबरच वेस्ट इंडिजनं पाच मॅचच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा बॅटींग करताना लेंडल सिमन्स (Lendl Simmons) 47 आणि पोलार्ड 51 रनच्या जोरावर 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 167 रन केले. त्याला उत्तर देताना दक्षिण  आफ्रिकेनं निर्धारित ओव्हर्समध्ये 9 आऊट 146 पर्यंत मदल मारली. वेस्ट इंडिजने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. ख्रिस गेलनं दुसऱ्याच ओव्हरमध्ये त्यांना पहिला धक्का दिला. क्विंटन डी कॉकनं (Quinton de Kock) एक बाजू लावून धरली होती. त्याने 43 बॉलमध्ये सहा फोर दोन सिक्सच्या मदतीनं 60 रन काढले. एडन मार्करामनं 20 तर डेव्हिड मिलरनं 12 रन काढले. कागिसो रबाडानं शेवटच्या ओव्हर्समध्ये 16 रनची खेळी केली. त्यानंतरही आफ्रिकेचा प्रतिकार कमी पडला. वेस्ट इंडिजकडून ड्वेन ब्राव्होनं 19 रनमध्ये चार विकेट्स घेतल्या. आंद्रे रसेलनं 2 तर गेल, पोलार्ड आणि मकॉय यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. यापूर्वी वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. लुईस, गेल आणि हेटमायर हे तीन्ही प्रमुख बॅट्समन मोठा स्कोअर करण्यात अपयशी ठरले. सिमन्सनं एक बाजू लावून धरत 34 बॉलमध्ये चार सिक्स आणि चार फोरच्या मदतीनं 47 रन काढले. क्रिकेटमध्ये पुन्हा फिक्सिंग! 2 क्रिकेटपटूंवर 8 वर्षांची बंदी, भारतीय सट्टेबाजाकडून घेतले होते पैसे वेस्ट इंडिजची अवस्था ऐकवेळ  6 आऊट 101 झाली होती. त्यावेळी पोलार्ड आणि या सीरिजमध्ये फॉर्मात असलेल्या फॅबियन एलननं 33 बॉलमध्ये 66 रनची नाबाद भागिदारी केली. पोलार्डनं 25 बॉलमध्ये 51 तर  एलननं 12 बॉलमध्ये 19 रन काढले.
    Published by:News18 Desk
    First published: