• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • पहिल्याच बॉलवर विकेट घेतल्यानंतर ख्रिस गेलचं मैदानात सेलिब्रेशन, पाहा VIDEO

पहिल्याच बॉलवर विकेट घेतल्यानंतर ख्रिस गेलचं मैदानात सेलिब्रेशन, पाहा VIDEO

अनुभवी गेलनं (Chris Gayle) पहिल्याच बॉलवर दक्षिण आफ्रिकेचा ओपनिंग बॅट्समन रिझा हेंड्रिक्सला (Reeza Hendricks) चकावले. गेलचा पहिलाच बॉल पुढं येऊन खेळण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि तो स्टंप आऊट झाला.

 • Share this:
  मुंबई, 2 जुलै: वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका (West Indies vs South Africa) यांच्यातील चौथी टी 20 मॅच गुरुवारी झाली. यजमान वेस्ट इंडिजनं यामध्ये 21 रननं विजय मिळवला. या विजयाबरोबरच 5 मॅचची ही मालिका सध्या 2-2 अशी बरोबरीत आहे. वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा बॅटींग करत 6 आऊट 167 पर्यंत मजल मारली होती. दक्षिण आफ्रिकेला हे आव्हान पार करता आले नाही. वेस्ट इंडिजच्या बॅटींगची मोठी भिस्त युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलवर (Chris Gayle) होती. गेलला टीमची ही अपेक्षा पूर्ण करता आली नाही. तो फक्त 5 रन काढून आऊट झाला. कागिसो रबाडानं त्याला आऊट केले. बॅटींगमधील हे अपयश गेलनं बॉलिंगमध्ये भरुन काढले. कॅप्टन पोलार्डने पॉवर प्लेमध्येच गेलच्या हातात बॉल दिला होता. अनुभवी गेलनं पहिल्याच बॉलवर दक्षिण आफ्रिकेचा ओपनिंग बॅट्समन रिझा हेंड्रिक्सला (Reeza Hendricks) चकवले. गेलचा पहिलाच बॉल पुढं येऊन खेळण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि तो स्टंप आऊट झाला. थर्ड अंपायरनं हेंड्रिक्सला आऊट देताच गेलनं मैदानात जोरदार सेलिब्रेशन केले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हेंड्रिक्स आऊट झाल्यानंतर क्विंटन डी कॉकनं (Quinton de Kock) एक बाजू लावून धरली होती. त्याने 43 बॉलमध्ये सहा फोर दोन सिक्सच्या मदतीनं 60 रन काढले. एडन मार्करामनं 20 तर डेव्हिड मिलरनं 12 रन काढले.कागिसो रबाडानं शेवटच्या ओव्हर्समध्ये 16 रनची खेळी केली. त्यानंतरही आफ्रिकेचा प्रतिकार कमी पडला. वेस्ट इंडिजकडून ड्वेन ब्राव्होनं 19 रनमध्ये चार विकेट्स घेतल्या. आंद्रे रसेलनं 2 तर गेल, पोलार्ड आणि मकॉय यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अवघ्या 10 बॉलची Test Match! 'या' दोन देशांमध्ये रंगला होता सर्वात लहान सामना यापूर्वी वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. स्ट इंडिजची अवस्था ऐकवेळ  6 आऊट 101 झाली होती. त्यावेळी पोलार्ड आणि या सीरिजमध्ये फॉर्मात असलेल्या फॅबियन एलननं 33 बॉलमध्ये 66 रनची नाबाद भागिदारी केली. पोलार्डनं 25 बॉलमध्ये 51 तर  एलननं 12 बॉलमध्ये 19 रन काढले.
  Published by:News18 Desk
  First published: