मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WI vs PAK : श्वास रोखून धरणाऱ्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर थरारक विजय

WI vs PAK : श्वास रोखून धरणाऱ्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर थरारक विजय

वेस्ट इंडिजनं थरारक लढतीमध्ये पाकिस्तानचा (West Indies vs Pakistan 1st Test) 1 विकेटनं पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (WTC) सुरुवात जोरदार केली आहे.

वेस्ट इंडिजनं थरारक लढतीमध्ये पाकिस्तानचा (West Indies vs Pakistan 1st Test) 1 विकेटनं पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (WTC) सुरुवात जोरदार केली आहे.

वेस्ट इंडिजनं थरारक लढतीमध्ये पाकिस्तानचा (West Indies vs Pakistan 1st Test) 1 विकेटनं पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (WTC) सुरुवात जोरदार केली आहे.

मुंबई, 16 ऑगस्ट : वेस्ट इंडिजनं थरारक लढतीमध्ये पाकिस्तानचा (West Indies vs Pakistan 1st Test) 1 विकेटनं पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (WTC) सुरुवात जोरदार केली आहे. जमेकामध्ये झालेल्या या मॅचमध्ये टेस्ट क्रिकेटचा संपूर्ण थरार अनुभवायला मिळाला. वेस्ट इंडिजला विजयासाठी 168 रनचे टार्गेट होते. त्यावेळी त्यांची अवस्था 9 आऊट 151 झाली होती. पाकिस्तानचा विजय नक्की मानला जात असतानाच केमार रोच (Kemar Roach) आणि जेडेन सील्स (Jayden Seales) या शेवटच्या जोडीनं 17 रनची भागिदारी करत वेस्ट इंडिजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

168 रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. त्यांचे पहिले तीन बॅट्समन झटपट आऊट झाले. त्यानंतर रोस्टन चेस आणि ब्लॅकवूड या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 68 रनची भागिदारी केली. फहीम अश्रफनं चेसला आऊट करत ही जोडी फोडली. त्यानंतर वेस्ट इंडिजची इनिंग गडगडली. 9 विकेट्स पडल्यानंतर पाकिस्तान विजयी होणार असं वाटत असताना रोच- सील्स जोडीनं पराभवाच्या दाढेतून विजय खेचून आणला.

'तुझं लक्ष कुठं आहे?', पंतला विचारला विराटनं प्रश्न, रोहित शर्माही नाराज VIDEO

19 वर्षाच्या क्रिकेटपटूचा विक्रम

यापूर्वी पाकिस्तानची दुसरी इनिंग 203 रनवर संपुष्टात आली. बाबर आझमनं सर्वात जास्त 55 रन काढले. तो आऊट होताच पाकिस्तानची इनिंग गडगडली. जेडन सील्सनं तळाच्या बॅट्समनला संधी दिली नाही. सिल्सनं दुसऱ्या इनिंगमध्ये 5 विकेट्स घेतल्या. हा विक्रम करणारा तो वेस्ट इंडिजचा सर्वात तरुण बॉलर बनला. यापूर्वी वेलेंटाईननं 1950 साली 20 व्या वर्षी 5 विकेट्स घेतल्या होत्या. सील्सनं 19 वर्ष 340 दिवस वय असताना हा रेकॉर्ड केला. या सीरिजमधील दुसरी आणि शेवटची टेस्ट शुक्रवारपासून सुरु होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, Pakistan, West indies