इंग्लंडचे 7 खेळाडू दोन अंकी रन देखील करू शकले नाहीत. ओपनर जेसन रॉयनं 6 तर टॉम बँटननं 4रन काढले. कॅप्टन इयन मॉर्गन (Eoin Morgan) देखील मोठी खेळी करू शकला नाही. तो 29 बॉलमध्ये 17 रन काढून आऊट झाला. जॉर्डन आणि राशिदनं आठव्या विकेटसाठी इंग्लंडकडून 36 रनची सर्वोच्च भागिदारी केली. टीम इंडियाविरुद्ध सीरिज जिंकल्यानंतर आफ्रिकेला धक्का, ICC नं सुनावली शिक्षा वेस्ट इंडिजनं सुरूवात चांगली केली. ब्रँडन किंग आणि शाई होप यांनी पहिल्या विकेटसाठी 52 रनची पार्टनरशिप केली. होपनं 25 बॉलमध्ये 20 रन काढले. त्याला राशिदनं आऊट केलं. किंग 49 बॉलमध्ये 52 रन काढून नाबाद राहिला. त्याने 4 फोर आणि 1 सिक्स लगावला. निकोलस पूरननं 29 बॉलमध्ये नाबाद 27 रन काढले. इंग्लंडकडून फक्त राशिदला एकमेव विकेट मिळाली. इंग्लंड टीमची कामगिरी खराब झाली आहे. यापूर्वी अॅशेस सीरिजमध्ये त्यांचा 4-0 असा पराभव झाला होता.Best T20 bowling figures ever for Jason Holder
The all-rounder was named Player of the Match in the West Indies' T20I victory over England as the icing on the cake pic.twitter.com/S4uEwbOtjX — ICC (@ICC) January 22, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, England, West indies