मुंबई, 17 जुलै : वेस्ट इंडिजनं पाचव्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 16 रननं (WI vs AUS) पराभव केला आहे. मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचं आक्रमक अर्धशतक आणि त्याला शेल्डन कॉट्रेल (Sheldon Cottrel) आणि आंद्रे रसेल (Andre Russell) यांच्या बॉलिंगची साथ यामुळे वेस्ट इंडिजने या मालिकेतील शेवटचा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाचा पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा पराभव होता. या पराभवामुळे त्यांच्या आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे.
वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा बॅटींग करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 199 रन केले. मुंबईचा माजी ओपनिंग बॅट्समन एविन लुईसनं (Evin Lewis) आक्रमक अर्धशतक झळकावलं. लुईसने 34 बॉलमध्ये 79 रन काढले. त्याच्या खेळीत 4 फोर आणि 9 सिक्सचा समावेश होता. वेस्ट इंडिजनं नियमित अंतरानं विकेट गमावल्या. पण ख्रिस गेल आणि निकोलस पूरन यांनीही फटकेबाजी केल्यानं त्यांना ऑस्ट्रेलियासमोर चांगलं लक्ष्य ठेवता आले. गेलनं 2 सिक्सच्या मदतीनं 21 रन काढले. तर कॅप्टन पूरननं 18 बॉलमध्ये 31 रनची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून एण्ड्रयू टायनं सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या. मिचेल मार्श आणि एडम झम्पा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलिया पुन्हा फ्लॉप
200 रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. जोश फिलिप पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आरोन फिंच (Aaron Finch) फॅबियन एलन (Fabian Allen) याने घेतलेल्या जबरदस्त कॅचमुळे आऊट झाला. फिंचने हेडन वॉल्शच्या फुलटॉस बॉलवर टोला लगावला होता. त्याने मारलेला बॉल बांऊड्री लाईनच्या बाहेर जाईल असा सर्वांचा अंदाज होता. त्याचवेळी एलननं त्याच्या डावीकडे झेपावत एका हाताने अप्रतिम कॅच घेतला. त्यानं घेतलेला कॅच पाहून फिंचला क्षणभर विश्वास बसला नाही. फिंच 23 बॉलमध्ये 34 रन काढले. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शनं 15 बॉलमध्ये 30 रनची खेळी केली.
IPL पूर्वी 40 वर्षांच्या धोनीनं केलं वजन कमी, पाहा स्लिम और फिट माहीचे नवे PHOTOS
ऑस्ट्रेलियाला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 183 रनच करता आले. वेस्ट इंडिजकडून कॉट्रेल आणि रसेल यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket, West indies