मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WI vs AUS : पंजाबच्या खेळाडूनं एका हातानं झेपावत घेतला थरारक कॅच, पाहा VIDEO

WI vs AUS : पंजाबच्या खेळाडूनं एका हातानं झेपावत घेतला थरारक कॅच, पाहा VIDEO

वेस्ट इंडिजनं पाचव्या टी20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा (WI vs AUS) 16 रननं पराभव केला. या विजयाबरोबरच पाच सामन्यांची मालिका वेस्ट इंडिजनं 4-1 नं जिंकली. शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी बॉलिंग आणि बॅटींग नाही तर फिल्डिंगमध्ये देखील कमाल केली.

पुढे वाचा ...

मुंबई, 17 जुलै : वेस्ट इंडिजनं पाचव्या टी20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा (WI vs AUS) 16 रननं पराभव केला. या विजयाबरोबरच पाच सामन्यांची मालिका वेस्ट इंडिजनं 4-1 नं जिंकली. शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी बॉलिंग आणि बॅटींग नाही तर फिल्डिंगमध्ये देखील कमाल केली. पंजाब किंग्ज (PBKS) कडून खेळणारा वेस्ट इंडिजचा स्पिनर फॅबियन एलन (Fabian Allen) याने ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आरोन फिंच  (Aaron Finch) याचा बाऊंड्रीवर एक  जबरदस्त कॅच घेतला.

फिंचने हेडन वॉल्शच्या फुलटॉस बॉलवर टोला लगावला होता. त्याने मारलेला बॉल बांऊड्री लाईनच्या बाहेर जाईल असा सर्वांचा अंदाज होता. त्याचवेळी एलननं त्याच्या डावीकडे झेपावत एका हाताने अप्रतिम कॅच घेतला. त्यानं घेतलेला कॅच पाहून फिंचला क्षणभर विश्वास बसला नाही. फिंच 23 बॉलमध्ये 34 रन काढून आऊट झाला. धोकायदायक वाटत असणारा फिंच निर्णायक क्षणी आऊट झाल्यानं ऑस्ट्रेलियाची टीम बॅकफुटवर गेली.

तिसऱ्या सामन्यातही पकडला होता कॅच

या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात देखील एलननं फिंचचा असाच एक जबरदस्त कॅच घेतला होता.  विशेष म्हणजे त्यावेळी देखील वॉल्श फिल्डर होता. फिंचने मारलेला बॉल पकडण्याचा प्रयत्न ड्वेन ब्राव्होनं (Dwayne Bravo) केला होता. मात्र त्याच्या हाताला लागून बॉल उडाला. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या एलननं चपळाईनं कॅच पकडला होता.

Tokyo Olympic मध्ये कोरोनाचा शिरकाव, 6 दिवसांनी सुरू होणार स्पर्धा

वेस्ट इंडिजनं पाचव्या टी20 मध्ये ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 200 रनचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाची टीम निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 आऊट 183 रनच करू शकली.

First published:
top videos

    Tags: Australia, Cricket, West indies