मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WI vs AUS : आक्रमक रसेल गेला फेल, थरारक लढतीत ऑस्ट्रेलियाचा विजय

WI vs AUS : आक्रमक रसेल गेला फेल, थरारक लढतीत ऑस्ट्रेलियाचा विजय

आक्रमक बॅटींगसाठी प्रसिद्ध असलेल्या आंद्रे रसेलच्या (Andre Russell) संथ खेळीमुळे वेस्ट इंडिजचा चौथ्या टी20 सामन्यात पराभव झाला. शेवटपर्यंत रंगलेल्या या लढतीत अखेर ऑस्ट्रेलियानं बाजी मारली.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 15 जुलै : टी20 सामन्याचा थरार काय असतो हे वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया (West Indies vs Australia) मालिकेतील  चौथ्या सामन्यामध्ये दिसला. या सामन्यात अवघ्या दोन ओव्हरमध्ये दोन टोकाचा खेळ झाला. 19 वी ओव्हर सुरु होण्यापूर्वी वेस्ट इंडिजला विजयासाठी 36 रनची आवश्यकता होती. 19 व्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजनं 25 रन वसूल केले. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांना फक्त 6 रन करता आले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 4 रनने जिंकला. रसेल ठरला फेल आक्रमक बॅटींगसाठी प्रसिद्ध असलेल्या आंद्रे रसेलच्या (Andre Russell) संथ खेळीमुळे वेस्ट इंडिजचा हा पराभव झाला. वेस्ट इंडिजला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 11 रनची आवश्यकता होती. अनुभवी मिचेल स्टार्कनं (Mitchell Starc) टाकलेल्या त्या ओव्हरमध्ये रसेलनं पहिल्या चार बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात त्याला एकही रन निघाला नाही. रसेलने पाचव्या बॉलवर त्याने दोन रन काढले. शेवटच्या बॉलवर फोर लगावला. पण तोपर्यंत ऑस्ट्रेलियानं मॅच जिंकली होती. रसेलच्या या संथ खेळीमुळे फॅबियन एलननं केलेली आक्रमक खेळी व्यर्थ ठरली. त्याने 19 व्या ओव्हरमध्ये 4 सिक्स लगावले होत. 19 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर एलन आऊट झाला. त्यानंतर रसेल शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जिंकून देईल असा वेस्ट इंडिजच्या फॅन्सचा अंदाज होता. पण शेवटच्या ओव्हरमध्ये रसेल फेल गेला. मिचेल मार्शची ऑल राऊंड कामगिरी ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करताना मिचेल मार्शच्या (Mitchell Marsh) 75 रनच्या जोरावर 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 189 पर्यंत मजल मारली. मार्शनला कॅप्टन आरोन फिंचनं (Aaron Finch) 53 रन काढत चांगली साथ दिली. मिचेल मार्शनं त्यानंतर बॉलिंगमध्येही कमाल केली. त्याने 24 रनच्या मोबदल्यात तीन विकेट्स घेतल्या. IND vs ENG : स्मृती मंधानाची आक्रमक खेळी व्यर्थ, इंग्लंडकडून भारताचा पराभव वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन टीममचा हा पहिलाच विजय आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत  वेस्ट इंडिजकडं सध्या 3-1 अशी विजयी आघाडी आहेय
First published:

Tags: Australia, Cricket, West indies

पुढील बातम्या