पंतच्या समोर धोनी काहीच नाही; ट्रोल करण्याआधी ही बातमी वाचा!

पंतच्या समोर धोनी काहीच नाही; ट्रोल करण्याआधी ही बातमी वाचा!

जाणून घेऊयात आकडेवारीच्या माध्यमातून धोनी आणि पंत यांच्यामध्ये कोण सरस आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर: भारतीय संघाने बुधवारी झालेल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिके(South Africa)वर शानदार विजय मिळवला. कर्णंधार विराट कोहलीचे अर्धशतक आणि त्याने घेतलेला कॅच चर्चेत होता. पण या सामन्यात आणखी एक खेळाडू चर्चेत राहिला तो म्हणजे ऋषभ पंत (Rishabh Pant)होय. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यता पंत 5 चेंडूत 4 धावा करून बाद झाला. त्यामुळेच सोशल मीडियावर देखील तो ट्रोल झाला. एकूण पंतच्या कामगिरीमुळे त्यांचे संघातील स्थान धोक्यात आल्याची चर्चा आहे. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पंत बेजबाबदारपणे बाद झाला. पंतच्या कामगिरीवर याआधी देखील कर्णधार विराट कोहली(Virat Kohli), प्रशिक्षक रवी शास्त्री(Ravi Shastri) आणि फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड(Vikram Rathour) यांनी सार्वजनिक वक्तव्य केले आहे. रवी शास्त्रींनी तर आफ्रिकाविरुद्धची टी-20 मालिका सुरु होण्याआधीच स्पष्ट शब्दात सांगितले होते की, पंतने वेस्ट इंडिज दौऱ्य़ातील चुका पुन्हा केल्या तर त्याचा फटका त्याला बसेल. पंतची तुलना नेहमीच महेंद्रसिंग धोनी(MS Dhoni)शी केली जाते. पण कामगिरीचा विचार करता पंत खरच धोनीपेक्षा मागे आहे का? ज्या पद्धतीने पंतवर टीका केली जात आहे त्यावरून पंत खुपच खराब खेळतोय की काय असे वाटते. जाणून घेऊयात आकडेवारीच्या माध्यमातून धोनी आणि पंत यांच्यामध्ये कोण सरस आहे.

पंतच्या बेजबाबदपणे बाद होण्यावरून त्याचे संघातील स्थान धोक्यात असल्याची चर्चा आहे. पण आतापर्यंतची पंतची कामगिरी पाहता धोनी आणि त्याची कामगिरी जवळपास सारखीच आहे. इतक नव्हे तर कसोटीमध्ये तर पंतची कामगिरी धोनीपेक्षा चांगली आहे. तर वनडे आणि टी-20मध्ये धोनी आणि पंत यांची कामगिरी सारखीच आहे. फरक फक्त एकच गोष्टीचा आहे की धोनीला तेव्हाचा कर्णधार सौरव गांगुली आणि संघ व्यवस्थापनाचा मोठा पाठिंबा होता. पंतला देखील असाच पाठिंबा मिळाला होता पण तो आता कमी होत चालला आहे.

कसोटीत पंत विरुद्ध धोनी

पंतने आतापर्यंत 11 कसोटीत 18 डाव खेळले आहेत. यात त्याने 44.35च्या सरासरीने 754 धावा केल्या आहेत. पंतच्या नावावर दोन शतके आणि दोन अर्धशतकांची देखील नोंद आहे. नाबाद 159 ही त्याची सर्वोच्च धाव संख्या आहे. पंतने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघाविरुद्ध शतकी खेळी केली आहेत. तर अर्धशतकांमध्ये दोन्ही वेळा तो 8 धावांनी शतक करण्यापासून दुर राहिला होता. याउलट धोनीच्या कसोटीमधील पहिल्या 18 डावांचा विचार केल्यास त्याने केवळ 580 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याची सरासरी 35च्या आसपास होती. धोनीने एक शतक आणि 3 अर्धशतकी खेळी केल्या होत्या. धोनीने त्याचे शतक पाकिस्तानविरुद्ध तर अर्धशतक भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये केले होते. 148 ही धोनीची सर्वोच्च खेळी होती. या दोन्ही आकडेवारीचा विचार करता धोनीपेक्षा पंतची कामगिरी सरस असल्याची दिसते.

वनडेत पंत विरुद्ध धोनी

पंतने आतापर्यंत 12 वनडे खेळल्या आहेत. यातील 10 डावात त्याने 22.90च्या सरासरीने 229 धावा केल्या आहेत. 48 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. क्रिकेटच्या या प्रकारात पंत फार चांगली कामगिरी करू शकला नाही. याबाबत धोनीचा विचार केल्यास त्याने 10 सामन्यात 29च्या सरासरीने 282 धावा केल्या होत्या. अर्थात धोनीने त्याच्या करिअरच्या 5व्या वनडेत शतकी खेळी केली होती. हे शतक त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीकरताना केली होती. या ठिकाणी धोनी पंतपेक्षा पुढे असल्याचे दिसून येते.

Cricket - ICC Cricket World Cup Semi Final - India v New Zealand - Old Trafford, Manchester, Britain - July 10, 2019 India's Rishabh Pant reacts losing his wicket Action Images via Reuters/Lee Smith - RC1C866A0760

टी-20त पंच विरुद्ध धोनी

पंतने टी-20मध्ये 19 सामन्यात 20.40च्या सरासरीने 306 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. 65 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. धोनीने त्याच्या पहिल्या 19 टी-20 सामन्यात 25च्या सरासरीने 310 धावा केल्या. यात एकाही अर्धशतकाचा समावेश नव्हता. 45 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. पण पंत आणि धोनीच्या बाबत एक गोष्ट वेगळी आहे. ती म्हणजे या दोघांचा फलंदाजीला येण्याचा क्रम होय. पंत टॉप ऑर्डरमध्ये खेळण्यास येतो तर धोनी तळाच्या क्रमवारीत फलंदाजीसाठी येत असे. या फरकाशिवाय दोघांच्या टी-20 करिअरची कामगिरी समानच आहे.

पंतचे आतापर्यंतचे करिअर आणि धोनीच्या सुरुवातीच्या करिअरची तुलना केल्यास दोघांच्या कामगिरीत फार मोठा फरक नाही. पण धोनीने प्रत्येक वर्षी त्याच्या खेळात सुधारणा केली. धोनीवर कधीच विकेट बेजबाबदारपणे गमवण्याचा आरोप झाला नाही. पंतच्या बाबत हाच मोठा आरोप केला जात आहे. जर धोनी प्रमाणेच पंतने देखील हा डाग बाजूला केल्यास तो महान खेळाडू होऊ शकेल.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकले का पंत?

पंतवर होणारी टीका विचारात घेता. तसेच रवी शास्त्री आणि विक्रम राठोड यांनी त्याला दिलेला इशारा पाहता आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये संघात जागा मिळवणे पंतसाठी अवघड होत चालले आहे. आक्रमक क्रिकेट आणि बेजबाबदार क्रिकेट यात फरक असतो, अशा शब्दात राठोड यांनी पंतला समज दिली होती. सध्या अशीही चर्चा सुरु आहे की, धोनीने निवृत्ती जाहीर न करण्याचे एक मुख्य कारण त्याला योग्य असा पर्याय मिळालेला नाही.

राष्ट्रवादीचं पंतप्रधान मोदींना जशाच तसे उत्तर, पाहा हा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: September 19, 2019, 5:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading