मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /राहुल द्रविडच्या मोठेपणाचा गांगुलीने सांगितला किस्सा, वाचून वाटेल अभिमान

राहुल द्रविडच्या मोठेपणाचा गांगुलीने सांगितला किस्सा, वाचून वाटेल अभिमान

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) मोठेपणाचा एक खास किस्सा सांगितला आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) मोठेपणाचा एक खास किस्सा सांगितला आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) मोठेपणाचा एक खास किस्सा सांगितला आहे.

मुंबई, 12 डिसेंबर : टीम इंडियाचा हेड कोच म्हणून राहुल द्रविडनं (Rahul Dravid) काम सुरू केले आहे. द्रविडच्या कार्यकाळातील न्यूझीलंड विरूद्धची पहिली सीरिज टीम इंडियाने जिंकली आहे. आता भारतीय टीम 16 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे.  द्रविड हेड कोच झाल्यापासून टीम इंडियाचा हा पहिलाच विदेश दौरा असेल. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकण्यासाठी द्रविड या दौऱ्यात भारतीय टीमला प्रशिक्षण देणार आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी 'क्रिकेट नेक्सट' शी बोलताना राहुल द्रविडच्या साधेपणाचा एक किस्सा सांगितला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कानपूर टेस्टच्या (India vs New Zealand Kanpur Test) दरम्यान ही घटना घडली.

गांगुलीने सांगितलं की, ' मी असं ऐकलंय की कानपूर टेस्टच्या पूर्वी प्रॅक्टीस झाल्यानंतर राहुल द्रविड प्रॅक्टीसच्या वेळी वापरण्यात आलेला बॉल आणि इतर सर्व साहित्य स्वत: उचलून ड्रेसिंग रूमध्ये नेत होता. राहुल द्रविडला हे सर्व करताना पाहणे ही कॅमेरामन आणि फोटोग्राफर्ससाठी सुवर्णसंधी असेल. पण, मला याचं नवल वाटत नाही. मी त्याला बऱ्याच काळापासून ओळखतो. त्याचा स्वभवाच तसा आहे. खेळाच्या बाबतीतमधील प्रत्येक लहान गोष्टीची द्रविड काळजी घेतो.'

गांगुलीने यापूर्वी एका मुलाखतीमध्ये द्रविड हेड कोच कसा बनला याची Inside Story सांगितली आहे. 'टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी माझ्या आणि जय शहा यांच्या मनात द्रविडचे नाव होते. पण,  घरापासून दीर्घकाळ दूर राहवं लागत असल्यानं द्रविड ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार नव्हता. या कामासाठी त्याला 8 ते 9 महिने घराबाहेर राहावे लागणार होते, द्रविडला दोन मुलं आहेत. त्यामुळे त्याची यासाठी तयारी नव्हती.

एक वेळ अशी आली की आम्ही देखील हार मानली होती. त्याची नॅशनल क्रिकेट अकादमीच्या  (National Cricket Academy) प्रमुखपदी नियुक्ती केली. या पदावर नियुक्ती झाल्यानंतरही आम्ही सातत्यानं त्याच्या संपर्कात होतो. अखेर तो या जबाबदारीसाठी तयार झाला, असे गांगुलीने स्पष्ट केले होते.

टीम इंडियाचा कॅप्टन झाल्यानंतर रोहित शर्मा आज पहिल्यांदाच घेणार विराट कोहलीची भेट

राहुल द्रविड 2015 साली सर्वप्रथम बीसीसीआयच्या कोचिंग सिस्टमचा भाग झाला. त्याने 4 वर्ष इंडिया ए आणि अंडर 19 टीमच्या हेड कोचची जबाबदारी सांभाळली. त्याच्या कार्यकाळात तयार झालेल्या या टीममधील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याचबरोबर अंडर 19 टीमनं 2018 साली वर्ल्ड कप देखील जिंकला आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Rahul dravid, Sourav ganguly