मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विराटची होणार होती टीम इंडियातून हकालपट्टी! वाचा कुणामुळे वाचली कोहलीची जागा

विराटची होणार होती टीम इंडियातून हकालपट्टी! वाचा कुणामुळे वाचली कोहलीची जागा

विराट कोहली (Virat Kohli) हा क्रिकेटच्या तीन्ही फॉर्मेटमधील सर्वोत्तम बॅटरपैकी एक आहे. टीम इंडियाच्या बॅटींगचा आधार असलेल्या विराटच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. पण, विराटची टीम इंडियातून हकालपट्टी होणार होती.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 नोव्हेंबर: विराट कोहली (Virat Kohli) हा क्रिकेटच्या तीन्ही फॉर्मेटमधील सर्वोत्तम बॅटरपैकी एक आहे. टीम इंडियाच्या बॅटींगचा आधार असलेल्या विराटच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. पण, विराटची टीम इंडियातून हकालपट्टी होणार होती, असा खुलासा टीम इंडियाचा माजी व्हाईस कॅप्टन वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) नं केला आहे. सेहवागनं याचा किस्सा सांगितला आहे.

विराटच्या टेस्ट कारकिर्दीची सुरूवात साधारण झाली होती. त्यानं वेस्ट इंडिज विरुद्ध 2011 साली पहिल्या तीन टेस्टमध्ये फक्त 76 रन काढले होते. त्यामुळे त्याला टीममधून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला बराच काळ बेंचवर बलावं लागलं. त्याचवर्षी ऑस्ट्रेलियाच्य दौऱ्यावर विराटला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली. त्या दौऱ्यातही विराटची कामगिरी साधारण होत होती. टीम इंडियाच्या अन्य बॅटर्सप्रमाणे विराटही रन काढण्यासाठी संघर्ष करत होता.

'पर्थमध्ये 2012 साली होणाऱ्या टेस्टपूर्वी विराटच्या जागी रोहित शर्माला खेळवण्याची निवड समितीची इच्छा होती. त्यावेळी मी टीमचा व्हाईस कॅप्टन तर धोनी कॅप्टन होता. आम्ही विराटला पाठिंबा दिला. त्यानंतर काय घडलं तो इतिहास सर्वांच्या समोर आहे.' असं सेहवागनं सांगितलं.

धोनी आणि सेहवागनं दिलेला पाठिंबा हा विराट कोहलीच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर त्याला एकदाही टेस्ट टीममधून वगळण्यात आलं नाही. पर्थ टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये विराटनं 44 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 75 रन काढले. त्यानंतर झालेल्या चौथ्या टेस्टमध्ये विराटनं शतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात टेस्ट सीरिजमध्ये शतक झळकावणारा तो एकमेव भारतीय बॅटर होता. टेस्ट सीरिजनंतर झालेल्या तिरंगी मालिकेतही विराटनं जबरदस्त खेळ केला.

T20 World Cup: कपिल देव यांचा टीम इंडियावर गंभीर आरोप, BCCI कडं केली हस्तक्षेपाची मागणी

टीम इंडियानं त्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला तेव्हा तिसऱ्या टेस्टनंतर कॅप्टन धोनीनं अचानक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर विराटला टेस्ट टीमचं कॅप्टन करण्यात आलं. विराटच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं 38 टेस्ट जिंकल्या असून तो टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. विराटनं आजवर 96 टेस्टमध्ये 51.08 च्या सरासरीनं 7765 रन काढले आहेत. त्यानं आता टी20 इंटरनॅशनल टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारत विरुद्ध नामिबिया (India vs Namibia) यांच्यात सोमवारी होणारी लढत त्याच्या टी20 कॅप्टनसीच्या कारकिर्दीतील शेवटची मॅच असणार आहे.

First published:

Tags: Team india, Virat kohli