मुंबई, 27 मे : महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) हा चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. धोनी 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्यानंतरही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. तो फॅन्स प्रमाणेच खेळाडू तसंच कोचिंग स्टाफमध्येही लोकप्रिय आहे. आयपीएलमधील चेन्नईची मॅच संपल्यानंतर धोनीच्या स्वाक्षरीतील जर्सी घेण्यासाठी प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूंची गर्दी होत असते.
चेन्नई सुपर किंग्सनं थ्रो डाऊन स्पेशालिस्ट कोंडप्पा राज पलानी याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यानं धोनीसोबत पहिल्यांदा झालेल्या भेटीचा अनुभव सांगितला आहे. पलानी आणि धोनीची पहिली भेट आयपीएल 2020 दरम्यान झाली. त्यावेळी धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
सीएसकेच्या अधिकृत वेबसाईटशी बोलताना पलानीनं सांगितलं की, 'मी धोनीला नेट बॉलिंग करणार होतो. त्याला पाहून सर्व टीममध्ये आनंदाचं वातावरण होतं. आम्ही नेट बॉलर्स धोनीच्या निवृत्तीची चर्चा करत होतो. स्टीफन फ्लेमिंग, मायकल हसी यांनी मला धोनीला काळजीपूर्वक बॉल टाकण्याची सूचना केली होती. मी पहिले दोन बॉल वाईड टाकले. त्यानंतरचा बॉल फुलटॉस टाकला.
Here's another episode of our Heroes off the field. Throwdown Specialists' words of passion & pawsome that lift up the spirits high!
Watch Full ️https://t.co/xF52e9HhxQ#Yellove #WhistlePodu pic.twitter.com/0DVFCEUvxz — Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 26, 2022
धोनी त्यानंतर माझ्याकडे आला आणि 'मला पाहणं बंद कर. तू नेहमीसारखी बॉलिंग कर' असं म्हणाला.त्यानंतर मी जेव्हा-जेव्हा बॉलिंग केली त्यावेळी धोनी माझ्यावर खूश झाला. तो मला आता चांगलं ओळखतो असं पलानीनं सांगितलं.
IPL मधून बाहेर पडताच झारखंडच्या निवडणुकीत ड्यूटी करू लागला धोनी! वाचा, Viral Photo चे सत्य
आयपीएल 2022 मध्ये धोनीनं 14 सामन्यातील 13 इनिंगमध्ये 232 रन केले. यामध्ये त्यानं एक अर्धशतक देखील झळकावलं. मुंबई इंडियन्स विरूद्धच्या मॅचमध्ये धोनीनं शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत सीएसकेला विजय मिळवून दिला होता. सीएसकेसाठी हा सिझन निराशाजनक ठरला. त्यांना 14 पैकी फक्त 4 सामने जिंकता आले. त्यामुळे गतविजेत्या टीमचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.