मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /इम्रान खाननं मॅच जिंकण्यासाठी मागितले होते 2 भारतीय, ऑस्ट्रेलियन कॅप्टननं केली बोलती बंद

इम्रान खाननं मॅच जिंकण्यासाठी मागितले होते 2 भारतीय, ऑस्ट्रेलियन कॅप्टननं केली बोलती बंद

हा 1980 च्या दशकातील प्रसंग आहे. त्यावेळी इम्रान खानच्या (Imran Khan) कॅप्टनसीमध्ये पाकिस्तानची टीम (Pakistan Cricket Team) ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज खेळण्यासाठी गेली होती.

हा 1980 च्या दशकातील प्रसंग आहे. त्यावेळी इम्रान खानच्या (Imran Khan) कॅप्टनसीमध्ये पाकिस्तानची टीम (Pakistan Cricket Team) ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज खेळण्यासाठी गेली होती.

हा 1980 च्या दशकातील प्रसंग आहे. त्यावेळी इम्रान खानच्या (Imran Khan) कॅप्टनसीमध्ये पाकिस्तानची टीम (Pakistan Cricket Team) ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज खेळण्यासाठी गेली होती.

मुंबई, 27 एप्रिल : अनेक अविस्मरणीय तसंच मजेदार आठवणींनी  क्रिकेटचा इतिहास समृद्ध आहे. कोणत्याही क्रिकेटपटूसाठी त्याच्या देशाचं प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची बाब असते. क्रिकेट मॅचच्या दरम्यान अनेकदा दोन खेळाडूंमध्ये स्लेजिंग होते. तर काही वेळा मजेदार शाब्दिक चकमकी उडतात. पाकिस्तानचा माजी कॅप्टन इम्रान खान (Imran Khan) आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन अ‍ॅलन बॉर्डर (Allan Border) यांच्यात घडलेला एक प्रसंग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हा 1980 च्या दशकातील प्रसंग आहे. त्यावेळी इम्रान खानच्या कॅप्टनसीमध्ये पाकिस्तानची टीम ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियन टीमचा कॅप्टन अ‍ॅलन बॉर्डर होता. मॅचच्या पूर्वी दोन्ही कॅप्टनची सिडनीमध्ये अनौपचारिक बैठक झाली. यावेळी इम्राननं मॅच जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन कॅप्टनकडं दोन भारतीयांची मागणी केली होती. त्याला बॉर्डरनं दिलेल्या तिखट उत्तरानंतर इम्रानची बोलती बंद झाली.

काय दिले उत्तर ?

या भेटीच्या दरम्यान इम्रान खान बॉर्डरला म्हणाला की, 'तू मला सुनील गावसकर आणि भागवत चंद्रशेखर दे. मी त्यानंतर ऑस्ट्रेलियाला हरवेल.' त्यावर बॉर्डर लगेच म्हणाला की, 'तू मला पाकिस्तानचे फक्त 2 अंपायर्स दे मी सर्व जगाला हरवेन.' बॉर्डरचं हे उत्तर ऐकल्यानंतर इम्रानची वाचा बसली. त्यावेळी पाकिस्तानी अंपायर्सची क्रिकेट विश्वातील प्रतिमा चांगली नव्हती. या गोष्टीचा बॉर्डरच्या उत्तराला संदर्भ होता.

IPL 2022 : तुळजापूरच्या खेळाडूला कधी खेळवणार? CSK च्या कोचनं दिलं उत्तर

बॉर्डरनं मागितली माफी

ऑस्ट्रेलियन कॅप्टनच्या या उत्तराचा इम्रान खानला चांगलाच त्रास झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियालाही (Cricket Australia) बॉर्डरचं हे उत्तर आवडलं नाही. त्यांनी या उत्तरासाठी इम्रान खान आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) माफी मागण्याचे आदेश बॉर्डरला दिले. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया टीमच्या कॅप्टनमधील ती आजवरची सर्वात खराब मीटिंग होती. इम्रान आणि बॉर्डर या दोन्ही कॅप्टननी पुढे आपआपल्या देशाला वर्ल्ड कप जिंकून दिला. अ‍ॅलन बॉर्डरच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियानं 1987 साली वर्ल्ड कप जिंकला. तर पाकिस्ताननं इम्रान खानच्या कॅप्टनसीमध्ये 1992 साली वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.

First published:
top videos

    Tags: Australia, Cricket news, Imran khan, Pakistan Cricket Board