मिताली राजला वगळल्यावर सौरव गांगुलीला आठवला आपला दुर्दैवी भूतकाळ

कर्णधाराला बाहेर बसायला सांगितलं जातं, तेव्हा तुम्ही तेच करा. पाकिस्तान दौऱ्यावेळी फैसलाबादमध्ये मीही हेच केलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Nov 26, 2018 03:13 PM IST

मिताली राजला वगळल्यावर सौरव गांगुलीला आठवला आपला दुर्दैवी भूतकाळ

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौव गांगुली म्हणाला की, महिला टी२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या उपांत्या फेरीत मिताली राजला न घेण्याच्या निर्णयाचं त्याला अजिबात आश्चर्य वाटलं नाही.

सलग दोन अर्धशतकी खेळी खेळूनही मितालीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या लीग सामन्या विरुद्ध आणि इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाच्या बाहेर ठेवण्यात आले. या सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं.

गांगुलीने याबद्दल बोलताना टॉलीगंज क्लबमध्ये म्हटले की, “संघाचं कर्णधारपद भूषवल्यानंतरही मला संघाच्या बाहेर काढण्यात आलं होतं. जेव्हा मी मितालीला मैदाना बाहेर बसलेलं पाहिलं, तेव्हा मी म्हणालो की, ‘ग्रुपमध्ये तुझं स्वागत आहे’.”

Loading...

गांगुलीने प्रशिक्षक ग्रेग चॅपलच्या वेळचं स्वतःचं उदाहरण देताना म्हटलं की, “कर्णधाराला बाहेर बसायला सांगितलं जातं, तेव्हा तुम्ही तेच करा. पाकिस्तान दौऱ्यावेळी फैसलाबादमध्ये मीही हेच केलं होतं.”

“तेव्हा एकदिवसीय सामन्यात मी सर्वोत्कृष्ट फलंदाज होतो. तेव्हा मी १५ महिने एकही एकदिवसीय सामना खेळलो नव्हतो. आयुष्यात अशा गोष्टी घडत असतात.”

गांगुली मितालीसाठी म्हणाला की, तिच्यासाठी आयुष्य इथेच संपत नाही. ‘तुम्ही हे नेहमीच लक्षात ठेवलं पाहीजे की तुम्ही काही तरी केलं आहे म्हणून तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात. पुन्हा संधी मिळेल. यामुळेच मितालीला संघाबाहेर काढल्याने मी निराश झालेलो नाही.’

‘मात्र भारतीय संघाच्या पराभवामुळे मी नक्कीच निराश झालो आहे. मला वाटलेलं ही टीम फार पुढे जाईल.जय- पराजय तर होतच राहतो. कारण आयुष्यात कशाचीच शाश्वती देऊ शकत नाही. तुम्ही तुमचं सर्वोत्तम देणं हेच तुमच्या हातात असतं.’

यावेळी गांगुलीला धोनीबद्दलही विचारण्यात आलं. धोनी गेल्या वर्षभरापासून धोनी चांगल्या फॉर्ममध्ये नाहीये. ऑस्ट्रेलियाच्या टी२० संघातूनही त्याल वगळण्यात आलं.

याबद्दल बोलताना गांगुली म्हणाला की, ‘धोनी एक चॅम्पियन आहे. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर गेली १२- १३ वर्ष तो सर्वोत्तम प्रदर्शन करत आहे. आताही त्याला तसंच करायचं आहे.’

‘जीवनात नेहमी हे होतच राहतं. तुम्ही कोणतंही काम करत असाल, कोणत्याही वयात, हुद्यावर, कुठेही असाल, तसेच तुमच्याकडे कितीही अनुभव असेल तरीही प्रत्येकवेळी तुम्हाला सर्वोत्तम प्रदर्शन करावंच लागतं. अन्यथा तुमची जागा दुसरं कोणतरी घेतं.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2018 02:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...