World Cup: विराटसेना जपून खेळा; होऊ शकते 2007ची पुनरावृत्ती! ICC world cup 2019 | India vs Bangladesh | India | Bangladesh | cricket

गेल्या काही वर्ल्ड कपचा इतिहास पाहिल्यास बांगलादेशने भारतासह अन्य मोठ्या संघांना स्पर्धे बाहेर काढले आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2019 02:04 PM IST

World Cup: विराटसेना जपून खेळा; होऊ शकते 2007ची पुनरावृत्ती! ICC world cup 2019 | India vs Bangladesh | India | Bangladesh | cricket

बर्मिंगहॅम, 02 जुलै: ICC cricket world cupमध्ये भारतीय संघ सेमीफायनलच्या दरवाज्यावर उभा आहे. आज मंगळवारी भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला केवळ एका विजयाची गरज आहे. तर सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी बांगलादेशला भारताविरुद्ध विजय मिळवणे गरजेचे आहे. एजबॅस्टन मैदाावर होणाऱ्या या सामन्यात विराट कोहीलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे पारडे जड असले तरी बांगलादेशला हलक समजण्याची चूक करता येणार नाही. गेल्या काही वर्ल्ड कपचा इतिहास पाहिल्यास बांगलादेशने भारतासह अन्य मोठ्या संघांना स्पर्धे बाहेर काढले आहे. अर्थात भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी केवळ एका गुणाची गरज आहे आणि भारताचा अद्याप आणखी एक सामना शिल्लक देखील आहे.

दक्षिण आफ्रिकेला दिला होता धक्का

बांगलादेशने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 21 धावांनी पराभव केला होता. वर्ल्ड कपमधील सर्वात धक्कादायक पराभव होता. याशिवाय त्यांनी वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानचा पराभव केला आहे.

World Cup: बांगलादेशविरुद्ध भारताची नजर सेमीफायनलवर; विराटसेनेला 'हा' आहे धोका!

इंग्लंडला दाखवला होता बाहेरचा रस्ता

Loading...

गेल्या वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठा धक्का बांगलादेशनेच दिला होता. बांगलादेशने इंग्लंडलाच स्पर्धेबाहेर काढले होते. इंग्लंड सारख्या बलाढ्य संघाचा पराभव करत बांगलादेशने क्वाटर फायनलमध्ये स्थान मिळवले होते. पण तेथे भारताने त्यांचा 109 धावांनी पराभव केला होता. इंग्लंडविरुद्ध तेव्हा बांगलादेशने 275 धावा केल्या होत्या. बदल्यात इंग्लंडचा डाव 260 धावात संपुष्ठात आला होता.

भारतालाही दिला होता धक्का

2007च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे पानिपत झाले होते. या स्पर्धेत भारतीय संघ पहिल्या फेरीतूनच बाहेर पडला होता. सुपर 8 मध्ये बांगलादेशने भारताला बाहेरचा रस्ता दाखवला होता. भारतीय संघाने बांगलादेश संघाला केवळ 192 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान त्यांनी 5 विकेटच्या बदल्यात पार केले होते.

1999मध्ये दिला होता पहिला झटका

बांगलादेशने 1999च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला 62 धावांनी पराभव करून पहिल्यांदा धक्का दिला होता. तेव्हा बांगलादेशने पाकला 223चे आव्हान दिले होते. बदल्यात पाकिस्तानला 161 धावाच करता आल्या होत्या.

VIDEO: 'मोदींच्या नेतृत्त्वात यांना यश मिळालं, या यशाचा उन्माद चढलाय'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 02:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...