'विरानुष्का'च्या रिसेप्शनला 'जम्बो' आल्यामुळे अनेकांना सुखद धक्का, काय आहे कारण ?

यावेळी अवघं बाॅलिवूड आणि क्रिकेटर जगत अवतरलं होतं. पण यावेळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेनं.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 27, 2017 09:15 PM IST

'विरानुष्का'च्या रिसेप्शनला 'जम्बो' आल्यामुळे अनेकांना सुखद धक्का, काय आहे कारण ?

27 डिसेंबर : विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं मंगळवारी मुंबईत दुसरं रिसेप्शन धुमधडाक्यात पार पडलं. यावेळी अवघं बाॅलिवूड आणि क्रिकेटर जगत अवतरलं होतं. पण यावेळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेनं.

विरानुष्काच्या रिसेप्शनला अनिल कुंबळेनं आपल्या पत्नीसह  हजेरी लावली. काही दिवसांपूर्वी अनिल कुंबळे आणि विराट कोहलीमध्ये प्रशिक्षकपदावरून वाद झाला होता.

त्यामुळे कुंबळेंनी प्रशिक्षकपद सोडले होते. त्यानंतर कुंबळेंनी फेसबुकवर एक पोस्ट करून विराट कोहलीला माझ्या कामाची पद्धत आवडत नाही. त्यामुळेच आपण प्रशिक्षकपद सोडले असा खुलासा केला होता. त्यानंतर काही दिवसांनी विराट कोहलीचे पसंतीचे रवी शास्त्री टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी विराजमान झाले.

विराट कोहली विवाहबंधनात अडकला. दिल्लीनंतर मुंबईत ग्रँड असे रिसेप्शन पार पडले. यावेळी अनिल कुंबळेंनी सर्व वाद बाजूला ठेवून विराटला शुभेच्छा दिल्यात. एकंदरीतच मैदानावर कितीही वाद असले तरी खासगी आयुष्यात आमच्या संबंधात कोणतीही कटूता नाही हे जम्बोने दाखवून दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2017 09:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...