मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /10 वर्षांनी टीममध्ये परतलेल्या खेळाडूनं दहा मॅचमध्ये दाखवला पाकिस्तान बोर्डाला आरसा

10 वर्षांनी टीममध्ये परतलेल्या खेळाडूनं दहा मॅचमध्ये दाखवला पाकिस्तान बोर्डाला आरसा

क्रिकेट बोर्डानं एक, दोन नाही तर तब्बल दहा वर्षे दुर्लक्ष केल्यानंतर क्रिकेटपटू टीममध्ये पुनरागमन करण्याची आशा सोडून देतात. पण पाकिस्तानचा (Pakistan) फवाद आलम (Fawad Alam) याला अपवाद ठरला.

क्रिकेट बोर्डानं एक, दोन नाही तर तब्बल दहा वर्षे दुर्लक्ष केल्यानंतर क्रिकेटपटू टीममध्ये पुनरागमन करण्याची आशा सोडून देतात. पण पाकिस्तानचा (Pakistan) फवाद आलम (Fawad Alam) याला अपवाद ठरला.

क्रिकेट बोर्डानं एक, दोन नाही तर तब्बल दहा वर्षे दुर्लक्ष केल्यानंतर क्रिकेटपटू टीममध्ये पुनरागमन करण्याची आशा सोडून देतात. पण पाकिस्तानचा (Pakistan) फवाद आलम (Fawad Alam) याला अपवाद ठरला.

मुंबई, 23 ऑगस्ट: क्रिकेट बोर्डानं एक, दोन नाही तर तब्बल दहा वर्षे दुर्लक्ष केल्यानंतर क्रिकेटपटू टीममध्ये पुनरागमन करण्याची आशा सोडून देतात. पण पाकिस्तानचा (Pakistan) फवाद आलम (Fawad Alam) याला अपवाद ठरला. त्यानं कधीही हार न मानली नाही. त्यामुळेच तब्बल 10 वर्ष आणि 88 टेस्टनंतर टीममध्ये परतल्यानंतर त्यानं नवे रेकॉर्ड केले आहेत. त्याचबरोबर त्याच्याकडं दुर्लक्ष करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) आरसा दाखवला आहे.

फवाद आलमनं 2009 साली श्रीलंकेविरुद्ध पदार्पणातील टेस्टमध्ये शतक केले होते. त्यानंतर तो फक्त 2 टेस्ट मॅच खेळला आणि टीमच्या बाहेर गेला. पदार्पणात शतक झळकावणाऱ्या फवादचा निवड समितीला विसर पडला होता. त्याचा तब्बल दहा वर्षांनी इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी समावेश करण्यात आला. पुनरामनानंतरच्या पहिल्या टेस्टमध्ये फवाद शून्यावर आऊट झाला. पण त्यानंतर त्यानं रन करण्याचा धडाका लावला आहे.

फवादनं पुनरागमानंतर वर्षभरात 4 शतक झळकावले आहेत. आता त्याच्या नावावर एकूण 5 शतकं आहेत. पाच वेगवेगळ्या देशात शतक झळकावण्याची कामगिरी त्यानं केली आहे. श्रीलंका, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये त्यानं शतक झळकावले आहे.

संकटातून काढले बाहेर

वेस्ट इंडिज विरुद्ध सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये फवादनं पाकिस्तानला संकटातून बाहेर काढले. या टेस्टमध्ये पाकिस्तानची सुरूवात 3 आऊट 2 अशी झाली होती. त्यावेळी त्यानं बाबर आझमच्या मदतीनं मोठी भागिदारी केली. पहिल्या दिवशी तो 76 रन काढून रिटायर हर्ट झाला होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशी पाकिस्तानची घसरगुंडी उडाल्यानंतर तो पुन्हा मैदानात परतला आणि त्यानं नाबाद 124 रनची खेळी केली.

World Athletics U20: भारताच्या शैली सिंहनं रचला इतिहास, लांब उडीत पटाकवले सिल्व्हर मेडल!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या प्रतीक्षेनंतर टीममध्ये परतलेला फवाद हा युनूस अहमद नंतरचा दुसरा खेळाडू आहे. युनूस अहमदनं 104 टेस्टच्या नंतर टीममध्ये पुनरागमन केले होते.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Pakistan, West indies