मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

जेसन होल्डर बनला थर्ड अंपायर, आपल्याच खेळाडूला दिलं OUT, पाहा VIDEO

जेसन होल्डर बनला थर्ड अंपायर, आपल्याच खेळाडूला दिलं OUT, पाहा VIDEO

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला असून यामध्ये वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन जेसन होल्डर (Jason Holder) थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 22 ऑगस्ट: क्रिकेटमध्ये पावसाचा अडथळा आल्यानंतर फॅन्सपेक्षा जास्त निराशा ही क्रिकेटपटूंची होती. पावसामुळे टीमची लय बिघडते. त्यामुळे या काळात उत्साह कायम ठेवणे हे खूप आवश्यक आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान  (West Indies vs Pakistan) यांच्यातील दुसऱ्या टेस्टचा दुसरा दिवस पावसामुळे वाया गेला. या सक्तीच्या ब्रेकमध्ये क्रिकेटपटूंनी खेळाचा आनंद घेतला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाला आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये वेस्ट इंडिजचे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये क्रिकेट खेळताना दिसत आहेत. ज्यामध्ये जेमार होल्डरच्या विरुद्ध बॉलर जोमेल वॉरिकन बॅटिंग करत होता. तर वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन जेसन होल्डर (Jason Holder) थर्ड अंपायरच्या भूमिकेत होता.

पाकिस्तान क्रिकेटला मिळणार नवा बॉस, वशिल्याचा क्रिकेटपटू म्हणून झाली होती टीका

या मॅचमधील ऑन फिल्ड अंपायर शमराह ब्रुक्सनं बॅट्समनला आऊट दिले. त्यानंतर वॉरिकननं रिव्यू घेण्याचा निर्णय घेतला. रिव्यूच्या दरम्यान खेळाडूंनी बॉल ट्रॅकिंगसह संपूर्ण बॉलचा रिप्ले घेतला. त्यानंतर थर्ड अंपायर असलेल्या जेसन होल्डरनं बॅट्समनला आऊट दिले.

First published:

Tags: Cricket news, Video Viral On Social Media