INDvsWI : भारताविरुद्ध मालिकेसाठी विंडीजचा संघ जाहीर

INDvsWI : भारताविरुद्ध मालिकेसाठी विंडीजचा संघ जाहीर

विंडीजच्या निवड समितीने म्हटलं आहे की, हा संघ फक्त भारताविरुद्ध नव्हे तर आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी तयारीच्या दृष्टीने निवडला आहे.

  • Share this:

जमैका, 23 जुलै : भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारताने रविवारी संघ जाहीर केला. त्यानंतर आता वेस्ट इंडीजने त्यांचा संघ जाहीर केला आहे. वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल या दौऱ्यात संघात नाही. संघात सुनिल नरेन आणि किरन पोलार्ड यांचे पुनरागमन झाले आहे. त्याशिवाय दुखापतीने काही काळ संघातून बाहेर असलेल्या आंद्रे रसेलने तंदुरुस्तीनंतर संघात स्थान पटकावलं आहे.

भारताविरुद्धच्या पहिल्या दोन टी20 सामन्यासाठी सुनील नरेन आणि किरन पोलार्ड यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. अँथनी ब्रेंबल पदार्पण करणार असून तो यष्टीरक्षक असेल. तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी संघात बदल होऊ शकतो.

दुखापतीने वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेल्या आंद्रे रसेलनं फिटनेस टेस्ट पास केली आहे. त्याला संघात स्थान मिळाले आहे. मात्र, स्फोटक फलंदाज ख्रिस गेल मात्र खेळू शकणार नाही. सध्या तो कॅनडामध्ये जीटी20 मध्ये खेळत आहे. त्याच्या जागी सलामीवीर जॉन कॅपबेलला संधी देण्यात आली आहे.

विंडीजचा गोलंदाज सुनील नरेनच्या खांद्यावर फिरकीची जबाबदारी असेल. तो दोन वर्षांनी टी 20 खेळणार आहे. पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघाची निवड कऱण्यात आली आहे.

निवड समितीने सांगितलं की, सुनील नरेन आणि पोलार्ड यांनी जगभरात टी20 लीगमध्ये चांगले प्रदर्शन केलं आहे. दोघेतही शारीरिक आणि मानसिदृष्ट्या सक्षम आहेत. यामुळेच त्यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. आम्ही फक्त भारताविरुद्धच्या दौऱ्याकडे बघून संघ निवडला नाही. आगामी टी20 वर्ल्ड कपसुद्धा महत्त्वाचा आहे.

विंडीजचा टी 20 संघ : कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार),अँथनी ब्रेंबल, जॉन कॅपबेल, शेल्डन कॉट्रेल, शिम्रॉन हेटमायर, एविन लुईस, सुनील नरेन, कीमो पॉल, किरन पोलार्ड, निकोलस पूरन, रॉमन पॉवेल, आंद्रे रसेल, ओशाने थॉमस

चहलने सरकारी नोकरीसाठी फिल्डिंग करताना घातला होता चष्मा!

World Cup मध्ये शमी-जडेजा यांच्यामुळे रोहित-विराटचं बिनसलं?

VIDEO : प्रसिद्ध अमेरिकी टेनिसपटूच्या लग्नात बॉलिवूडच्या 'या' गाण्यानं धम्माल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 12:57 PM IST

ताज्या बातम्या