M.S.धोनीला परदेशी क्रिकेटपटूचा सॅल्यूट; म्हणाला...

धोनीचे कौतुक करणाऱ्यामध्ये आता एका परदेशी खेळाडूचा समावेश झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2019 08:52 PM IST

M.S.धोनीला परदेशी क्रिकेटपटूचा सॅल्यूट; म्हणाला...

नवी दिल्ली, 29 जुलै: World Cup 2019मधील सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचा न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर टीम इंडिया स्पर्धेबाहेर पडली. भारताच्या या पराभवानंतर अशी चर्चा सुरू झाली होती की महेंद्र सिंग धोनी वनडे क्रिकेटमधून निवृत्त होईल. पण धोनीने आपण दोन महिन्यासाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली. तेव्हा देखील निवड समितीचे प्रमुख एम.एस.के.प्रसाद यांनी धोनीच्या भविष्यासंदर्भात कोणतेही वक्तव्य केले नाही. दुसरीकडे धोनी टेरिटोरिअल आर्मीमधील पॅरॅशूट रेजीमेंटमध्ये दोन महिन्यासाठी दाखल होत आपण वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी उपलब्ध असू असे सांगितले. धोनीला टेरिटोरिअल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल हे मानद पद देण्यात आले आहे. धोनीने लष्करात सेवा देण्याच्या निर्णयाचे गौतम गंभीर, कपिल देवसह अनेक क्रिकेटपटूंनी कौतुक केले होते. धोनीचे कौतुक करणाऱ्यामध्ये आता एका परदेशी खेळाडूचा समावेश झाला आहे. या परदेशी खेळाडूने धोनीचे केवळ कौतुक केले नाही तर त्याला सलाम देखील केला आहे.

Loading...

वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये विकेट घेतल्यानंतर खास स्टाईलने सॅल्यूट करणारा वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज सेल्डन कॉटरेल सर्वांना आठवत असेल. याच कॉटरेलने धोनीसाठी एक भावनिक संदेश लिहला आहे. देशासाठी कर्तव्य बजावणाऱ्या धोनीचे कॉटरेलने कौतुक केले आहे. आपल्या ट्विटरवर तो म्हणतो, ही व्यक्ती क्रिकेटच्या मैदानावर प्रेरणा देतो. त्याच बरोबर देशाविषयी असणारे कर्तव्याला देखील अग्रस्थान देतो. दरम्यान, पॅरॅशूट रेजीमेंटमध्ये दोन महिन्यासाठी सेवा बजावणाऱ्या धोनीची नियुक्ती काश्मीर खोऱ्यात झाली आहे. धोनीने विनंती केल्यानंतर त्याला गस्त घालणाऱ्या पथकात तसेच गार्ड आणि चौकीवर तैनात केले जाणार आहे.

धोनीपेक्षाही चतुर निघाला 'हा' विकेटकीपर, VIDEO पाहून व्हाल हैराण!

धोनीबद्दल लष्कर प्रमुख म्हणाले...

कारगिल दिवस निमित्त लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी एनडीटिव्हीला दिलेल्या मुलाखतीत, "धोनीची आम्हाला काळजी घेण्याची गरज नाही. लष्करानं दिलेली कामं करण्यास तो सज्ज आहे. लवकरच जनतेचा रक्षक म्हणून तो सर्वांसमोर येईल. पण त्यासाठी काही काळ त्याला सराव करावा लागेल", असे सांगितले. "धोनीचे बेसिक ट्रेनिंग पूर्ण झाले आहे. खर तर धोनीवर आता मोठी जबाबदारी आहे. कारण तो 106 क्षेत्रीस सेनेसोबत काम करत आहे. धोनी त्याला दिलेली कामं पूर्ण करत आहे. त्यामुळं लवकरच धोनी जनतेच्या सेवेसाठी सज्ज असेल", असे ते म्हणाले.

धोनी 31 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत सैन्यासोबत सराव करणार आहे. या कालावधीत धोनी 106 क्षेत्रीय सेनेसोबत राहत सराव करणार आहे. दरम्यान या अंतर्गत धोनी लष्करातील सर्वात खतरनाक असलेल्या विक्टर फोर्समध्ये ट्रेनिंग घेत आहे. यात पेट्रोलिंग गार्ड आणि पोस्ट ड्युटी या सारख्या जबाबदाऱ्या धोनी सांभाळणार असल्याची लष्करी अधिकाऱ्याची माहिती दिली.

2015मध्ये धोनीनं घेतले होते ट्रेनिंग

महेंद्रसिंग धोनीकडे क्षेत्रीय सेनेच्या पॅराशूट रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नलपद आहे. याअंतर्गत धोनी 2015मध्ये पॅराट्रुपरचे ट्रेनिंग घेतले होते. आग्रा येथे ट्रेनिंग धोनीनं विशेष प्रशिक्षण घेतले होते. क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर धोनी लष्करात सामिल होण्याची तयारी करत आहे, असे मत चाहते व्यक्त करत आहेत.

पिवळ्या साडीतील महिला कर्मचारी थिरकली 'टिप टिप बरसा पाणी..'वर, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 08:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...