मुंबई, 19 डिसेंबर : वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने (Windies Cricket Board) मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाने त्यांची निवड समिती बरखास्त केली असून त्याच्या जागी हंगामी समितीची स्थापना केली आहे. नव्या समितीची स्थापना लवकरच करण्यात येणार आहे. टीमचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स हे या हंगामी समितीचे प्रमुख असतील. वेस्ट इंडिजच्या सर्व प्रकारातील टीमच्या कॅप्टनचा हंगामी समितीमध्ये समावेश आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेट टीमच्या निवड समितीचे प्रमुख रोजर हार्पर आणि त्यांचे सहकारी माईल्स बासकॉम्बे यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यांना मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचं बोर्डाने स्पष्ट केले आहे. याबाबत वेस्ट इंडिज क्रिकेच बोर्डाचे प्रमुख रिकी स्केरिट यांनी अधिक बोलण्यास नकार दिला आहे.
CWI to commence recruitment for Senior Men’s Selection Panel | Details here: https://t.co/TShIz9rLAo
— Windies Cricket (@windiescricket) December 18, 2021
निराशाजनक कामगिरी
वेस्ट इंडिज क्रिकेट टीमची गेल्या काही महिन्यातील कामगिरी निराशाजनक झाली आहे. पाकिस्तान विरुद्ध नुकत्याच झालेल्या टी20 सामन्यांच्या मालिकेत त्यांचा 0-3 या फरकाने पराभव झाला. त्यापूर्वी टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) वेस्ट इंडिजला विजेतेपद राखता आले नाही. त्यांना संपूर्ण स्पर्धेत फक्त 1 विजय मिळाला. त्यामुळे सेमी फायनलपूर्वीच टीमचे आव्हान संपुष्टात आले. या निराशाजनक कामगिरीचा संबंध बोर्डाने घेतलेल्या मोठ्या निर्णयाशी जोडला जात आहे.
World Championship: श्रीकांतची ऐतिहासिक कामगिरी, भारताचं सिल्व्हर मेडल निश्चित
वेस्ट इंडिज टीमची पुढील मालिका जानेवारी महिन्यात आयर्लंड विरुद्ध होणार आहे. या दोन्ही टीममध्ये 3 वन-डे आणि 1 टी20 सामना होईल. 8, 11 आणि 14 जानेवारी रोजी वन-डे सामना होणार असून 16 जानेवारी रोजी एकमेव टी20 लढत होणार आहे. हा टी20 सामना युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलच्या (Cheis Gayle) कारकिर्दीमधील शेवटचा सामना असण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, West indies