वेस्ट इंडिजच्या महान क्रिकेटपटूला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल

कसोटीत सलग पाच डावात शतके आणि कसोटीत सर्वात वेगवान 1 हजार धावा करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 11:23 PM IST

वेस्ट इंडिजच्या महान क्रिकेटपटूला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल

जमैका, 27 जून : वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू सर एवर्टन वीक्स यांना गुरुवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. 94 वर्षाचे असलेल्या वीक्स यांना क्वीन एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच बरे होतील असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. वीक्स यांनी वेस्ट इंडिजकडून खेळताना कसोटीत सलग पाच डावात शतक कऱण्याचा विक्रम केला होता. त्यांनी 48 कसोटीत 4 हजार 455 धावा केल्या आहेत. 1949 मध्ये त्यांनी सलग शतके करण्याची कामगिरी केली होती. त्यात सहाव्या डावात ते 90 धावांवर बाद झाले होते.

विंडीजच्या तीन महान डब्ल्यूमधील ते एक आहेत. त्यांच्याशिवाय सर फ्रँक वॉरेल आणि सर क्लाइड वॉलकोट हे होते. वीक्स यांनी 1957-58 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना झालेल्या दुखापतीने क्रिकेटला गुडबाय केलं होतं. त्यांना 1995 मध्ये नाइटहूडने गौरवण्यात आलं आहे.

वीक्स यांना 2009 मध्ये आयसीसीने क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये स्थान दिलं आहे. त्यांच्या नावावर कसोटीत सर्वात वेगवान 1 हजार धावा करण्याचा विक्रम आहे. त्यांनी फक्त 12 डावात ही कामगिरी केली होती. त्यांच्यासोबत हर्बर्ट सटक्लिफने 12 डावात हजार धावा केल्या होत्या.

Loading...

World Cup : भारतासमोर चौथ्या क्रमांकाचा पेच, रिषभ पंतला संधी द्यावी?

टीम इंडियाच्या भगव्या जर्सीची राजकीय बॅटिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 11:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...