विराट किती शतकं करणार? भारताच्या माजी क्रिकेटपटूनं केली ही भविष्यवाणी

विराट किती शतकं करणार? भारताच्या माजी क्रिकेटपटूनं केली ही भविष्यवाणी

भारताचा कर्णधार विराट कोहलीनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 42 शतकं केली आहेत तर एकूण 67 आंतरराष्ट्रीय शतकं झाली आहेत.

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : भारताचा कर्णधार विराट कोहलीनं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजविरुद्ध त्रिनिदादमध्ये शतकी खेळी केली. हे त्याचं एकदिवसीय क्रिकेटमधील 42 वं शतक होतं. त्यानंतर विराट सचिनचा 100 शतकांचा विक्रम मोडणार अशी चर्चा रंगली आहे. आता भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरनं म्हटलं आहे की विराट त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत 74 ते 80 शतकं करेल. विराटच्या 42 व्या शतकानंतर जाफरने ट्विटरवर ही भविष्यवाणी केली आहे.

जाफरने विराटच्या या शतकाबद्दल म्हटलं आहे की, 11 डावांचा ब्रेक घेतल्यानंतर सामन्य सेवा पुन्हा एकदा सुरू झाली. विराटचं आणखी एक शतक, माझी ही भविष्यवाणी आहे की कोहली 74 ते 80 शतकं करेल.

आतापर्यंत विराट सचिनचा 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडेल एवढंच म्हटलं जायचं. मात्र, फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्येच तो 74 शतकं करेल असं जाफरनं म्हटलं आहे. कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 67 शतकं झाली आहेत.

त्रिनिदादमध्ये झालेल्या सामन्यात विराटनं 42 वं शतक झळकावताच सचिनचा एक विश्वविक्रम मोडला. कोहलीचं वेस्ट इंडिजविरुद्ध 8 वं शतक आहे. त्यानं श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध 8 पेक्षा जास्त शतकं केली आहेत. तो पहिलाच असा खेळाडू आहे ज्यानं तीन देशांविरुद्ध 8 पेक्षा जास्त शतकं केली. सचिननं ऑस्ट्रेलिया आणि लंकेविरुद्ध ही कामगिरी केली आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आता आठव्या क्रमांकावर आहे. त्यानं 11 हजार 363 धावा करणाऱ्या सौरव गांगुलीला मागे टाकले. कोहलीनं 238 सामन्यात 59.71च्या सरासरीनं 11 हजार 406 धावा केल्या आहेत. तर, सगळ्यात जास्त धावा करण्याता विक्रमही अजूनही सचिनच्या नावावर आहे. सचिननं 463 सामन्यात 18 हजार 426 रन

सगळ्यात जास्त शतक लगावणारा कर्णधार

एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्या तरी संघाविरोधात सर्वात जास्त शतक करण्याती कामगिरी विराटनं केली आहे. विराटनं वेस्ट इंडिज विरोधात कर्णधारपदी असताना 6 शतक लगावण्याती कामगिरी केली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग यांनं न्यूझीलंड विरोधात सर्वात जास्त 5 शतक लगावले होते.

2000 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड

शतकी पारी करत विराटनं 34 डावांत वेस्ट इंडिज विरोधात 2 हजार धावा पूर्ण केल्या. हा एक अनोखा रेकॉर्ड आहे. विराट कोहली सर्वात कमी डावांमध्ये 2 हजार धावा करणारा खेळाडू झाला आहे. याआधी रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया विरोधात 37 डावांमध्ये 2 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यामुळं त्यानं रोहितला मागे टाकले.

'सांगली, कोल्हापुरातील महापुराला सरकारच जबाबदार?' पाहा SPECIAL REPORT

Published by: Suraj Yadav
First published: August 13, 2019, 11:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading