मुंबई, 9 जुलै : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफरनं (Wasim Jaffer) राहुल द्रविड (Rahul Dravid) बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. द्रविडला कधीही टीम इंडियाचा कायमस्वरुपी हेड कोच बनवू नये, असं जाफरनं सांगितलं आहे. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीमचा राहुल द्रविड हेड कोच आहे. रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ यावर्षी टी20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. त्यामुळे शास्त्रीच्या जागेवर द्रविड कोच होणार अशी चर्चा सुरू आहे.
जाफरनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर याबाबतचं कारण सांगितलं. 'टीम इंडिया सध्या दोन देशांचा दौरा करत आहे. यावरुन भारतीय क्रिकेट टीमची बेंच स्ट्रेंथ मजबूत आहे. तसंच टीमकडे सर्वोत्तम खेळाडूंची फौज असल्याचे स्पष्ट होते. माझ्या मते द्रविडने सध्या अंडर 19 आणि इंडिया ए टीमसोबत एनसीएमध्ये काम केले पाहिजे.
टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू हे प्रगल्भ आहेत. त्यामुळे द्रविडने नवे खेळाडू घडवण्यावर भर द्यावा. त्याच्या मार्गदर्शनामध्ये नवी पिढी तयार होईल. त्यामुळे द्रविडनं दीर्घकाळासाठी एनसीएमध्ये काम करावे. त्यामुळे भविष्यात टीम इंडियासाठी चांगले खेळाडू तयार होतील.'
IND vs SL : वन-डे मालिकेपूर्वी श्रीलंकन टीमबद्दल मोठं अपडेट
कपिल देवनं केली होती शास्त्रीची पाठराखण
टीम इंडियाचे माजी कॅप्टन कपिल देव (Kapil Dev) यांनीही काही दिवसांपूर्वी द्रविड की शास्त्री या विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. 'माझ्या मते या विषयावर चर्चा करण्याची गरज नाही, श्रीलंका दौरा समाप्त होऊ दे. त्यानंतर टीमचं प्रदर्शन कसं झालं, हे आपल्याला माहिती होईल. तुम्ही नवा कोच तयार करत असाल तर यात काही चूक नाही. पण, रवी शास्त्री यांच्या नेतृत्त्वाखाली टीमनं चांगली कामगिरी सुरू ठेवली तर त्यांना पदावरून दूर करण्याची गरज नाही. याबाबत सर्व गोष्टी येत्या काळात स्पष्ट होतील. सध्या या प्रकारच्या चर्चेतून कोच आणि खेळाडूंवर अतिरिक्त दबाव वाढेल.' असे मत कपिल देव यांनी व्यक्त केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Rahul dravid, Team india