• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • VVS लक्ष्मण भारतीय क्रिकेटसाठी करणार मोठा त्याग! वाचून वाटेल अभिमान

VVS लक्ष्मण भारतीय क्रिकेटसाठी करणार मोठा त्याग! वाचून वाटेल अभिमान

टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणची (VVS Laxman) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (NCA) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 नोव्हेंबर: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणची (VVS Laxman) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (NCA) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तो राहुल द्रविडची (Rahul Dravid) जागा घेणार आहे. द्रविडची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लक्ष्मण आता त्याच्या संपुर्ण कुटुंबासह बंगळुरूमध्ये शिफ्ट होणार आहे. द्रविड आणि लक्ष्मण यांच्या नियुक्तीमध्ये त्यांचा माजी सहकारी आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचे (Sourav Ganguly) मोठे योगदान आहे. बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यावेळी सांगितलं की, 'मुख्य कोच आणि एनसीए प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाल्यानं मी खूप खूश आहे. भारतीय क्रिकेटमध्ये हे दोन्ही पदं महत्त्वपूर्ण आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. ते दोघंही या जबाबदारीसाठी तयार झाले. तसंच त्यांना भारतीय क्रिकेटचं चांगलं करायचं आहे, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.' असं गांगुलीनं स्पष्ट केलं. आर्थिक कमाई होणार कमी गांगुलीनं यावेळी पुढे सांगितलं की, 'लक्ष्मणनं या पदासाठी सनरायझर्स हैदराबाद टीमचं मेंटॉरपद तसंच कॉमेंट्री करारासोबतच वेगवेगळ्या संस्थांसाठी कॉलम लिहणे देखील सोडले आहे. तो भारतीय क्रिकेटची सेवा करण्यासाठी पुढची तीन वर्ष कुटुंबासोबत बंगळुरूमध्ये शिफ्ट होणार आहे. विशेष म्हणजे त्याची आर्थिक कमाई कमी होणार असून तरीही तो हे काम करण्यासाठी तयार झाला आहे. लक्ष्मणची पत्नी आणि मुलंही बंगळुरूत शिफ्ट होणार आहेत. त्याची मुलं बंगळुरूत पुढील शिक्षण घेतील. नव्या वातावरणात त्यांना जुळवून घ्यावं लागेल. भारतीय क्रिकेटसाठी समर्पित असल्याखेरीज या गोष्टी करणे शक्य नाही. ही सोपी गोष्ट नाही,'असं गांगुलीनं यावेळी सांगितलं. Ashes मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणाऱ्या दिग्गजाला BCCI करणार बॉलिंग कोच एनसीए प्रमुख म्हणून लक्ष्मण काम करणार असल्यानं मोठा फरक पडणार आहे. कारण तो एक चांगला माणूस असून भारतीय क्रिकेटमधील त्याचे स्थान खूप वर आहे. लक्ष्मणची समर्पित वृत्ती पाहून त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर काम करणे हा नेहमीच चांगला अनुभव असतो. राहुलनं एनसीएमध्ये एक व्यवस्था निर्माण केली आहे. लक्ष्मण ती पुढे नेईल.' असा विश्वास गांगुलीनं यावेळी व्यक्त केला.
  Published by:News18 Desk
  First published: