मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

VIDEO: महेंद्रसिंह धोनी नाही तर राशिद खान! हेलिकॉप्टर शॉट पाहून सर्व थक्क

VIDEO: महेंद्रसिंह धोनी नाही तर राशिद खान! हेलिकॉप्टर शॉट पाहून सर्व थक्क

अफगाणिस्तानचा स्टार बॉलर राशिद खाननं (Rashid Khan) इंग्लंडमधील टी20 स्पर्धेत  (Vitality T20 Blast 2021) आक्रमक बॅटींगनं वादळ निर्माण केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 18 जुलै : अफगाणिस्तानचा स्टार बॉलर राशिद खाननं (Rashid Khan) इंग्लंडमधील टी20 स्पर्धेत  (Vitality T20 Blast 2021) आक्रमक बॅटींगनं वादळ निर्माण केलं आहे. राशिदने ससेक्सकडून खेळताना हॅप्शायरच्या विरुद्ध आक्रमक खेळी खेळली. या खेळीच्या दरम्यान राशिदने महेंद्रसिंह धोनीसारखा (MS Dhoni) हेलिकॉप्टर शॉट देखील लगावला. त्याचा व्हिडीओ सध्या चांगलाचा व्हायरल (Video Viral) झाला आहे.

या मॅचमध्ये ससेक्सनं पहिल्यांदा बॅटींग करताना 6 आऊट 183 रन काढले. यावेळी राशिद खाननं 13 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटनं 26 रन काढले. या खेळीच्या दरम्यान त्याने 4 फोर आणि एक सिक्स लगावला. राशिदनं लगावलेला सिक्स यावेळी सर्वांच्या चर्चेचा विषय होता. त्याने महेंद्रसिंह धोनीसारखाच (MS Dhoni) हेलिकॉप्टर शॉट लगावत सिक्स लगावला.

Tokyo Olympic: Anti Sex Bed पाहून खेळाडू नाराज, फोटो शेअर करत म्हणाला...

राशिद खानची ही वादळी बॅटींग त्यांच्या टीमला विजय मिळवून देऊ शकली नाही. हॅम्पशायरनं 184 रनचं लक्ष्य 4 बॉल शिल्लक असतानाच पूर्ण केले. हॅम्पशायरकडून जेम्स विन्सीनं शतक लगावले. त्याने 59 बॉलमध्ये 102 रन काढले. विन्सीनं या खेळात 14 फोर आणि 3 सिक्स लगावले.

First published:

Tags: Cricket, MS Dhoni, Video Viral On Social Media