• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • वीरेंद्र सेहवागनं शेअर केलं PK चं पोस्टर, खास शैलीत केलं आवाहन PHOTO

वीरेंद्र सेहवागनं शेअर केलं PK चं पोस्टर, खास शैलीत केलं आवाहन PHOTO

वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) सध्या सोशल मीडियावर कोरोनासंबंधी जागृती करत आहे. सेहवागनं यंदा आमिर खानच्या (Aamir Khan) पीके सिनेमाचं (PK) पोस्टर शेअर केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 9 मे: टीम इंडियाचा माजी ओपनिंग बॅट्समन वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) हा क्रिकेटमधील निवृत्तीनंतरही सक्रीय आहे. क्रिकेटची मॅच असो किंवा  ताजी घडामोड सेहवाग त्याच्या विशेष शैलीमध्ये सोशल मीडियावर (Social Media) प्रतिक्रिया देत असतो. त्याच्या प्रतिक्रियांकडं क्रिकेट फॅन्सचं नेहमी लक्ष असतं. त्याचे ट्विट्स, पोस्ट्स अनेकदा व्हायरल (Viral) झाले आहेत. देशात सध्या कोरोनाचा (Covid-19) प्रमाण वाढलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला मोठा फटका बसला आहे. अनेक राज्यांमध्ये सध्या कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. हॉस्पिटलमधील रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे.  आयपीएल स्पर्धेला (IPL 2021) देखील कोरोनाचा फटका बसला आहे. बायो-बबलमध्ये असलेल्या चार  खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानं आयपीएल स्पर्धा स्थगित करावी लागली. वीरेंद्र सेहवाग सध्या सोशल मीडियावर कोरोनासंबंधी जागृती करत आहे. सेहवागनं यंदा आमिर खानच्या (Aamir Khan) पीके सिनेमाचं (PK) पोस्टर शेअर केलं आहे. 'कोरोना जोपर्यंत त्याच्या घरी जात नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरामध्येच राहा. व्हॅक्सिन घ्या आणि डबल मास्कचा वापर करा." असं आवाहन सेहवागनं केलं आहे.
  कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी CSK आघाडीवर, विराटपाठोपाठ धोनीची टीम करतेय मोठी मदत गर्भवती डॉक्टरचाही शेअर केला होता फोटो यापूर्वी सेहवागनं गर्भवती महिला डॉक्टरचा फोटो शेअर केला होता. या फोटोमधील महिला डॉक्टर सात महिन्यांच्या गर्भवती असल्याचं सांगितलं जात असून त्या सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. सेहवागनं हा फोटो ट्विट करत म्हंटलं आहे की, “लोकांचं आयुष्य वाचावं म्हणून निस्वार्थी भावनेनं प्रयत्न करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत.” अशी प्रतिक्रिया सेहवागनं दिली होती.
  Published by:News18 Desk
  First published: